शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

साईबाबा सेवा मंडळातील वादाची याचिका फेटाळली

By admin | Updated: June 19, 2014 00:58 IST

वर्धा रोडवरील प्रसिद्ध साईबाबा मंदिराचे संचालन करणाऱ्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या सदस्यांना अवैध ठरविण्याचे जिल्हा न्यायालय व धर्मादाय प्रशासनाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

नागपूर : वर्धा रोडवरील प्रसिद्ध साईबाबा मंदिराचे संचालन करणाऱ्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या सदस्यांना अवैध ठरविण्याचे जिल्हा न्यायालय व धर्मादाय प्रशासनाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले होते. या निर्णयाविरुद्ध बाबासाहेब उत्तरवार यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.उपधर्मादाय आयुक्तांनी तयार केलेल्या योजनेत १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्याला आश्रयदाता सदस्य, १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्याला आजीवन सदस्य, तर १ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना साधारण सदस्य संबोधावे, असे म्हटले आहे. त्यानुसार श्री साईबाबा सेवा मंडळात २ आश्रयदाते, २२ आजीवन सदस्य, तर १८०५ साधारण सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. १९९८ मध्ये या सदस्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. मंडळाच्या कार्यकारी समितीचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून १९९८ मधील निवडणुकीत अरुणकुमार लाखानी अध्यक्ष तर अविनाश शेगावकर सचिव झाले होते. २००४ मध्ये अध्यक्षपदी सुधाकर वाचासुंदर तर सचिवपदी दिवंगत शशिकांत खांडवेकर निवडून आले होते. यानंतर २००९ च्या निवडणुकीपूर्वी राजू जयस्वाल, बाबासाहेब उत्तरवार, विजय तालेवार यांच्यासह एकूण २१ जणांनी मंडळ सदस्य व १९९८ मधील निवडणुकीच्या वैधतेला उपधर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. सदस्यांनी नियमापेक्षा कमी रक्कम भरल्याचा त्यांचा आक्षेप होता. सदस्यांनी मूळ रकमेपेक्षा किमान १ रुपया अधिक भरायला पाहिजे होता. ही बाब लक्षात घेता उपधर्मादाय आयुक्तांनी तक्रारकर्त्यांचा आक्षेप मान्य करून १९९८ मधील बदल अहवाल रद्द केला. या निर्णयाविरुद्ध अविनाश शेगावकर यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे अपील केले होते. सहधर्मादाय आयुक्तांनी उपधर्मादाय आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. यानंतर जिल्हा न्यायालयानेही सहधर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचे समर्थन केले. परिणामी शेगावकर यांनी उच्च न्यायालयात सेकंड अपील दाखल केले होते. गेल्या २७ फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सेकंड अपील मंजूर करून जिल्हा न्यायालय व धर्मादाय प्रशासनाचे आदेश रद्द केले होते. (प्रतिनिधी)