शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अकादमीने कायमच गाेमंतक लेखकांना डावलले; गाेव्याच्या महिला साहित्यिकांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 22:32 IST

‘लाेकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट, चित्रपटात रंगविलेल्या वाईट प्रतिमेसारखे गाेवा नाहीच, गाेमंतक लेखिकांचे मत

निशांत वानखेडे

नागपूर : गाेव्यातील अनेक लेखकांनी मराठी भाषेत दर्जेदार लेखन करून मराठी साहित्यात माेलाची भर घातली आहे. त्यामुळे साहित्य अकादमीद्वारे गाेमंतक साहित्यिकांना पुरस्कृत केले जावे, कार्यक्रमात सन्मानाने आमंत्रित करावे, अशी अपेक्षा असते. मात्र, साहित्य अकादमीने कायमच गाेमंतक साहित्यिकांना डावलले आहे, अशी खंत गाेमंतक लेखिकांनी व्यक्त केली आहे.

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरतर्फे अकाेला येथे रविवारपासून दाेन दिवसीय पहिले विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी हाेण्यास गाेव्याच्या विविध भागांतून लेखिका, कवयित्री, पत्रकार सहभागी झाले हाेते. यामध्ये चित्रा प्रकाश क्षीरसागर, प्रा. पाैर्णिमा राजेंद्र केरकर, कालिका राजेंद्र बापट, प्रा. सारिका आडविलकर, रजनी अरुण रायकर यांचा समावेश आहे. या साहित्यिकांनी शनिवारी ‘लाेकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना या संमेलनाबाबत भावना व्यक्त केल्या. यानिमित्ताने विदर्भ आणि गाेव्यातील साहित्यिक आणि साहित्य संस्थांमध्ये सेतूबंध निर्माण हाेईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हे खास महिलांचे साहित्य संमेलन असल्याने ज्या महिलांना लिहावे वाटते, व्यक्त व्हावे वाटते, त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची आहे. महिलांनी व्यक्त अन् माेकळे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुरुषी राजकारणाने महिला साहित्यिकांना मागे ठेवलेमहिलांना घर, संसार, मुलांचे संगाेपन, शिक्षण यांची बांधिलकी असते. नाेकरीपेशा महिलांची यात अधिक गैरसाेय हाेते. अशा परिस्थितीतही महिला लिहितात, व्यक्त हाेतात. ग्रामीण महिला तर वेगवेगळ्या समस्यांना ताेंड देत कणखरपणे साहित्यातून व्यक्त हाेतात, हे महत्त्वाचे आहे. अशा लेखिका, कवयित्रींना प्राेत्साहित करणे, सन्मानित करणे आवश्यक आहे. मात्र, इतर क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही पुरुषी मक्तेदारीच्या राजकारणाने महिलांना नेहमी मागे टाकले जात असल्याची टीका या लेखिकांनी केली.

चित्रपटात रंगविलेल्या वाईट प्रतिमेसारखे गाेवा नाहीचसमुद्र किनाऱ्यावरचा गाेंधळ, देशी-विदेशी ललना, अश्लिलता, कॅसिनाे, मद्यपान, अशी गाेव्याची प्रतिमा चित्रपट आणि इतर माध्यमांनी निर्माण केली आहे. सरकारही पर्यटनाच्या नावावर महसूल मिळविण्याच्या नादात याच गाेष्टींना प्राेत्साहन देत आले आहे. मात्र, जशी प्रतिमा दाखविली आहे, तसे गाेवा आणि गाेमंतक नाहीच. मूळ गाेमंतकांना हे नकाे आहे. गाेव्याच्या प्रत्येक भागात निसर्गसाैंदर्य आहे. देवळे, चर्च, मशिदी एकत्रित आहेत, धार्मिक सलाेखा आहे. हा सुंदर, साेज्वळ गाेवा कधी प्रकाशात आणलाच जात नाही. परप्रांतातून आलेल्या लाेकांमुळे गाेव्याची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे, अशी भावना या लेखिकांनी व्यक्त केली.