सहा वर्षांचा वनवास संपला : संकटांच्या मालिकेतही नाते राहिले अखंड सुषमा आणि सिद्धार्थ (काल्पनिक नाव) यांची हलाखीची परिस्थिती, त्यातच आईवडिलांचे छत्र हरविले, त्यामुळे जिव्हाळ्याचे नातेही गोठले. एकाने आधार दिला मात्र त्यामागे त्याचा स्वार्थ निघाला. शोषणामुळे बहिणीने घर सोडले, तर भावावर चोरीचा आळ घेतल्याने तो बाल कारागृहात पोहचला. दोघांची ताटातूट झाली. भरकटलेल्या बहिणीला शासकीय मुलींच्या बालगृहाचा आधार मिळाला तर भावाने मुंबई गाठली. तब्बल सहा वर्षे दोघांचीही गाठभेट झाली नाही. अचानक एक दिवस भाऊ बहिणीच्या शोधात नागपुरात आला. बरीच शोधाशोध केल्यानंतर बालगृहात त्याला बहीण मिळाली. हे कथानक सिनेमाला शोभेल असे असले तरी, ही सत्य घटना इंदोऱ्यात राहणाऱ्या बहीण-भावाच्या बाबतीत घडली आहे. सुषमा (काल्पनिक नाव) आणि सिद्धार्थ (काल्पनिक नाव) ही दोन भावंड. सुषमा आता १६ वर्षाची आहे. आणि सिद्धार्थ नुकतेच १८ वर्षे पूर्ण केली आहेत. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. मात्र दोन वर्षातच आईसुद्धा गेली. ताटातूट संपली, शेवट गोड नागपूर : काही दिवस सावत्र वडिलांजवळ काढले, परंतु त्याने दोघांनाही सावत्रपणाची वागणूक दिली. एका गुन्ह्यात वडिलांनाही शिक्षा झाली. त्यामुळे कसाबसा मिळालेला निवाराही हरविला. दोघांनी सावत्र वडिलांच्या बहिणीकडे निवारा शोधला. त्या बहिणीकडूनही छळ सुरू झाला. घरातील सर्व काम केल्यानंतर दोन वेळचे कसेबसे गिळायला मिळत होते. एक दिवस सुषमा संतापली, तिने कामास नकार दिला. त्यामुळे तिला भरपूर मारहाण झाली. निवारा हरवू नये म्हणून सिद्धार्थनेही त्यांना सपोर्ट केल्याने ती संतापली, घराबाहेर पडली. परिसरातच एका ओळखीच्या घरी ती राहू लागली. दरम्यान भावाने माझी बाजू न घेतल्यामुळे तिच्या मनात गैरसमज निर्माण झाला. परिसरात घडलेल्या एका चोरीच्या प्रकरणात तिने भावाच्या विरोधातच साक्ष दिली. त्यामुळे त्याला पोलिसांनी बाल निरीक्षण गृहात टाकले. त्यानंतर बहीण ओळखीच्या घरातूनही पळाली, भटकत भटकत शासकीय मुलींच्या बालगृहात पोहचली. दुसरीकडे सिद्धार्थची सुटका झाल्यानंतर एका दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने त्याने मुंबई गाठली. एका कंपनीत काम क रून त्याने पैसा गोळा केला आणि बहिणीच्या शोधात तो नागपुरात आला. बरीच शोधाशोध केल्यानंतर दोन महिन्यापूर्वी तो बालसदनमध्ये पोहचला. त्याच्याकडे बहिणीचा फोटो होता, आईवडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र होते. मी सुषमाचा भाऊ असल्याचे सांगितले. बालगृहाच्या अधिकाऱ्यांना त्याची सखोल चौकशी केल्यानंतर बहिणीची भेट करवून दिली. एकमेकांना बघताच दोघांनाही अत्यानंद झाला. सहा वर्षापूर्वी दुरावलेली बहीण पुन्हा मिळाली. दरम्यान सुषमाला सोबत घेऊन जाण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. परंतु ती अल्पवयीन असल्याने त्यांनी नकार दिला. पुन्हा बहिणीची ताटातूट होऊ नये म्हणून त्याने मुंबईला जाणे टाळले. सध्या तो इंदोरा परिसरात कबाडीचे काम करून किरायाने राहत आहे. आता दर आठवड्याला तो बहिणीच्या भेटीला बालगृहात जातो. पैसे गोळा करून बहिणीला चांगले शिक्षण देण्याचा मानस आहे. मंगेश व्यवहारे नागपूर बहिणीने भावाच्या मनटावर बांधलेली राखी केवळ धागा नसतो तर ती गुंफण असते दोन नात्यांमधील विश्वासाची. हा विश्वास अटळ असतो, अखंड असतो. सुषमा आणि सिद्धार्थ (काल्पनिक नाव) हे दोघे भावंडंही आज राखीच्या दिवशी हाच अनुभव घेत आहेत. त्यांच्या जीवनातील सहा वर्षांचा वनवास संपला असून आयुष्यात आलेल्या संकटांच्या मालिकेतही त्यांचे नाते अखंड राहिले आहे.
बहिणीच्या राखीला जागली भावाची माया
By admin | Updated: August 18, 2016 01:57 IST