नागपूर: अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI 171 दुर्घटनेत नागपूरच्या एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. नागपूरच्या क्वेटा कॉलनीत राहणाऱ्या मनिष कामदार यांच्या मुलगी यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र कामदार आणि यशाच्या सासू रक्षा मोढा यांचा मृतकांमध्ये समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच यशा कामदार यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
यषा कामदार यांचे सासरे लंडनमध्ये व्यवसाय करत होते. ते कॅन्सरच्या उपचारासाठी काही काळ अहमदाबाद येथे होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आठवणींसाठी लंडनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यशा कामदार, रुद्र आणि रक्षा मोढा हे तीनही शोकसभेसाठी लंडनला जात असताना या अपघाताचा फटका बसला.
अहमदाबाद विमान अपघाताची माहिती मिळताच नागपूरमधील कामदार कुटुंबीयांनी तातडीने अहमदाबादला गेले असल्याची माहिती मिळत आहे.