शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सदर भागात  सदरमध्ये दारुड्याचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:58 IST

वर्दळीच्या भागात हैदोस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काही वेळ वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडवली होती.

ठळक मुद्देवाहनांचे काच फोडले : जमावाकडून बेदम धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्दळीच्या भागात हैदोस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काही वेळ वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडवली होती.दारूच्या नशेत तर्र असलेला एक तरुण हातात दगड घेऊन दुपारी १ ते २ च्या दरम्यान सदरमधील एसएफएस चर्च ते अदनान बिल्डिंग मार्गावर अक्षरश: हैदोस घालत होता. तो नजरेस पडणाऱ्या वाहनचालकांकडे दगड घेऊन धावत होता. कारसह अन्य वाहनांच्या काचेवर दगड मारत होता. त्यामुळे या मार्गावर एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्याने दगड मारू नये म्हणून प्रत्येकजण स्वत:ला आणि आपले वाहन वाचविण्यासाठी धावपळ करीत होता. अशाच प्रकारे सिलिंडर पोहचविणारा इम्रान नामक तरुण आपल्या सहकाऱ्यांसह या भागात वाहन घेऊन आला. त्याच्यावर नजर पडताच दारुड्या आरोपीने दगड घेऊन त्याच्याकडे धाव घेतली. त्याने भलामोठा दगड सिलिंडर पोहचविणाऱ्या वाहनाच्या काचेवर मारला. दुसरा दगड घेऊन तो इम्रानवर धावला. त्याचा हैदोस पाहून एकत्रित झालेल्या जमावाने त्याला घेरले आणि पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर सदर पोलिसांना माहिती दिली. पोलीस पोहचले तेव्हा जमावाने दारुड्या तरुणाला पोलिसाच्या हवाली केले. पोलिसांनी हैदोस घालणाऱ्या दारुड्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याविरुद्ध कुणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. ज्या वाहनांच्या काचा आरोपीने फोडल्या त्यांनी पोलिसांचे लचांड नको म्हणून तेथून काढता पाय घेतला.धुलाईनंतर उतरली नशादरम्यान, नागरिकांनी चोप दिल्यानंतर हैदोस घालणाऱ्या दारूड्याची नशा उतरली. तो तामिळ-तेलगू सारख्या भाषेत बरळू लागला. तो काय बोलतो, हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर त्याचे नाव, पत्ता स्पष्ट झाला नव्हता.

टॅग्स :nagpurनागपूर