शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सदानंद फुलझेले अनंतात विलीन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:05 IST

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांची मुले अशोक, आनंद आणि सुधीर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.यानंतर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, महापौर संदीप जोशी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, डॉ. भाऊ लोखंडे, रणजित मेश्राम, प्रा. अशोक गोडघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. संचालन दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले.याप्रसंगी भंते नाग दीपांकर, भंते हर्षबोधी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, एन.आर. सुटे, प्रशांत पवार, तानाजी वनवे, डॉ. राजीव पोतदार, जयदीप कवाडे, भय्याजी खैरकर, ई. झेड. खोब्रागडे, इ. मो. नारनवरे, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. कृष्णा कांबळे, संजय जीवने, अनिल हिरेखन, स्मिता कांबळे, रवी शेंडे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, शिवदास वासे, राजू बहादुरे, बाळू घरडे, वंदना जीवने, भीमराव फुसे, घनश्याम फुसे, सुरेश साखरे, कैलास वारके, नरेश वाहाने, बाबा कोंबाडे, सुनील सारीपुत्त, निळू भगत, प्रमोद रामटेके, मधुकर मेश्राम, देवकुमार रंगारी, राहुल वानखेडे, रमेश पिसे, सच्चिदानंद दारुंडे, माया चौरे, सुरेश घाटे, नितीन गजभिये, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, ईश्वर बरडे, अतुल खोब्रागडे, श्वेता गणवीर, इंदू थुल, प्रमोद खांडेकर, मुन्ना नागदिवे, खुशाल लाडे आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आदी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीक्षाभूमीवरही अनेकांनी घेतले अंत्यदर्शनदिवंगत सदानंद फुलझेले यांची अंत्ययात्रा दुपारी २.३० वाजता त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावरून निघाली. ती दीक्षाभूमीवर आली. दिवंगत फुलझेले यांचे पार्थिव पवित्र दीक्षाभूमीवर लोकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, कमलताई गवई यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी भदंत सुरेई ससाई व भदंत नाग दीपांकर यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाने बुद्धवंदना घेतली.समता सैनिक दलाची मानवंदनादिवंगत सदानंद फुलझेले यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना व निळा सलाम देण्यात आला. भदंत नाग दिपांकर, राजकुमार वंजारी, प्रदीप डोंगरे, रश्मी मोटघरे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

टॅग्स :Deathमृत्यूDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी