शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:49 IST

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी केले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भोसला मिलिटरी स्कूलद्वारा आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर, सूर्यरतन डागा, कर्नल (सेवानिवृत्त) जे. एस. भंडारी, कुमार काळे, अजय शिर्के उपस्थित होते. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी कारगिल वीरांच्या शौर्याचे पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. कारगिल युद्धानंतर आता कोणतेही शत्रूराष्ट्र वा संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देश तो हल्ला कदापिही सहन करणार नाही. तो हल्ला परतवून लावेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी हे युद्ध यशस्वीरीत्या पार पाडले.कारगिल युद्धामध्ये देशातील अनेकांनी आपला पती, भाऊ, मुलगा गमावला. मात्र, देशातील जनतेने त्यांना त्याची कधीही जाणिव होऊ दिली नाही. हा देश वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी कारगिल विजय दिवसानिमित्त चित्रफितही दाखविण्यात आली. 

कारगिल विजय दिवसानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या ५१४ कॅडेसनी शानदार परेड सादर केली. दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या परेडने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अश्वस्वारही या परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडनंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना सलामी देण्यात आली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन