शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

Coronavirus in Nagpur; निर्दयी कोरोना; आईवडिलांचे छत्र हिरावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 08:00 IST

Coronavirus in Nagpur कोरोनाचे संकट काळाच्या रूपाने आले आहे. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या या संकटाने लहानग्या मुलांचे आईबाबाही हिसकावले आहेत. अनेक मुले अनाथ झाली असून काही कुटुंबात तर नातेवाईकांचा आधारही कोरोनाने हिरावला आहे.

ठळक मुद्देअनेक मुलांवर आली अनाथ होण्याची दुर्दैवी पाळीलहानपणीच अनेकांवर भावंडांचा सांभाळ करण्याची वेळ

योगेंद्र शंभरकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट काळाच्या रूपाने आले आहे. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या या संकटाने लहानग्या मुलांचे आईबाबाही हिसकावले आहेत. अनेक मुले अनाथ झाली असून काही कुटुंबात तर नातेवाईकांचा आधारही कोरोनाने हिरावला आहे. कुणाची आई गेली, कुणाचे बाब गेले, तर कुणाचे आईबाबा दोघेही गेले. आता लहानपणीच मुलांवर त्यांच्या भावंडांची जबाबदारी आली आहे. जगही न कळलेल्या वयामध्ये या मुलांवर आलेली ही आपत्ती हृदय पिळवटणारी आहे. होय, कोरोना निर्दयी झालायं !

घटना १ :

आई आधीच गेली, आता बाबाही..!

महालमधील ११ वर्षिय यश (नाव बदलले आहे) याचे वडील पूर्व नागपुरातील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक होते. काही वर्षापृूर्वी यशच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. आईच्या पश्चात त्याचे वडीलच यश आणि त्याच्या बहिणीची काळजी घ्यायचे. शाळेच्या तयारीपासून तर खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवायचे. कोरोना संकट आल्यापासून वडिलांचा पगार ५० टक्के झाला. यातून ते घरखर्च, कजराचे हप्ते चुकवत होते. याच काळात १० एप्रिलला वडील कोरोना संक्रमित झाले. उपचारासाठी मेयोमध्ये दाखल केले. मात्र १८ एप्रिलला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखेरच्या क्षणी मुले वडिलांना स्पर्शही करू शकली नाही.

घटना २ :

वडील वर्षभरापूर्वी अटॅकने, आता आईही गेली कोरोनाने

अजनी परिसरातील १२ वर्षाचा आर्यन आणि १८ वर्षाची नताशा या दोघांचेही छत्र उडाले. त्यांच्या वडिलांचा मृत्यू २०२० मध्ये हार्ट अटॅकने झाला होता. वडिलांच्या नंतर आईने संसाराची जबाबदारी उचलली. आता कुठे वडिलांच्या वियोगाच्या दु:खातून ही मुले बाहेर पडत होती. पण दुर्दैवाचा फेरा आडवा आला. १८ मार्चला नताशा संक्रमित झाली. उपचारानंतर ती दुरूस्त झाली. मात्र १९ मार्चला आईसुद्धा संक्रमित झाली. श्वास घेणे कठिण होत चालले. उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र काळाने पिच्छा सोडला नाही. २० मार्चला उपचारादरम्यान आईचे निधन झाले. या मुलांवर कोसळलेली आपत्ती शब्दात कशी मांडावी ?

आर्थिक अडचणीपायी सारेच कोलमडले

शहरातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणीचे मोठे संकट आहे. या संकटात तर अनेकजण पार कोलमडून गेले आहेत. घरांची खरेदी, बांधकाम यासाठी अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. कोरोनामुळे कामकाज बंद आहे. खाजगी संस्थेत काम करणाऱ्या पगारदारांचे पगारही अर्ध्यावर आले आहेत. दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचे तर पगारच बंद आहेत. कसेबसे घर चालवत असताना कोरोना दारावर थाप देत आहे. उपचारासाठी जवळचा पैसा गमावलेले तर आता पार कोलमडून गेले आहेत.

अनाथ मुलांना नातलगांचा आधार

आपले आईवडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ आता जवळचे नातेवाईक करत आहेत. डोळ्यात अविरत पाऊस घेऊन जगणाऱ्या या लहान मुलांचे अश्रु कसे पुसावे, कसे समजवावे, असा प्रश्न या नातेवाईकांसमोर आहे. आईबाबा गेले. आता आजी-आजोबा, काका, मावशी, मोठेवडील, आत्या हे नातेसंबंध छत्र बनून मुलांच्या संगोपनासाठी सरसावले आहेत. ही अनाथ मुले त्यांच्याकडे राहायला गेली असली तरी, आईवडिलांच्या प्रेमाची उब त्यांना कशी मिळणार ?

...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस