शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

धावत्याला येई शक्ती

By admin | Updated: August 10, 2015 02:57 IST

घरात अठराविश्वे दारिद्र्य. अभ्यासात मन नव्हते अन् समोर काय करायचे हे माहीत नव्हते.

सचिन बुरघाटे यांचा यशाचा मंत्र : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’मधून उलगडले अंतरंगनागपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य. अभ्यासात मन नव्हते अन् समोर काय करायचे हे माहीत नव्हते. संघर्ष सुरू होता, पण त्याला दिशा नव्हती. पण काही ‘टर्निंग पॉर्इंट्स’ आले अन् आयुष्य नव्या रूपाने जगण्याचा मंत्रच गवसला. मंत्र होता सदैव चालत राहण्याचा, न थांबता अविरत परिश्रम करण्याचा. यातूनच आज मी हजारो माणसे घडवतोय. हे शब्द आहेत लाखो युवकांसाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या सचिन बुरघाटे यांचे. ‘प्रयास सेवांकुर’तर्फे आयोजित ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात बुरघाटे यांनी आपल्या यशाचे अंतरंग सर्वांसमोर उलगडले. बी.आर.ए. मुंडले सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात ह्यप्रयासह्णचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी बुरघाटे यांची मुलाखत घेतली. सचिन बुरघाटे यांची अकोला येथे ‘अस्पायर’ नावाची संस्था असून, या माध्यमातून ते दरवर्षी सर्व वयोगटातील हजारोंना इंग्रजी शिकविण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वासदेखील जागृत करतात. बुरघाटे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील लाडेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा ते सातासमुद्रापार मारलेली मजल या आपल्या प्रवासातील अनुभव मांडले. लहानपणी पायात चप्पल घालणे म्हणजे काय हे माहीत नव्हते. बारावीपर्यंत तर आत्मविश्वास दूरदूरपर्यंत नव्हता. परंतु बारावीच्या वर्गात असताना एका चाचणीत पहिला क्रमांक आला अन् बाकापासून ते मंचापर्यंत बक्षिसाचे पेन स्वीकारायला जाताना अवघ्या १० पावलांत माझ्यातला ‘मी’ दिसला. त्यानंतर ‘डीएड’मध्ये प्रवेश घेतला, पण मन लागले नाही म्हणून सोडून दिले. एक वेळी जेवून ‘एमबीए’ झालो, पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागलो. पण तिथेदेखील समाधान मिळत नसल्याने बाहेर पडलो. अखेर ‘अस्पायर’ नावाची संस्था सुरू केली. लोकांनी वेड्यात काढले. पण मी ठरवले होते, थांबायचे नाही. आज हजारो तरुणांच्या मनात आत्मविश्वास जागवतो आहे. हेच माझ्या आयुष्याचे ‘मिशन’ आहे, असे सचिन यांनी सांगितले.आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ हा लोकांना भेटण्यातच जातो. स्वत:शी आपण भेटतच नाही. त्यामुळे अनेकदा पारंपरिक चौकटीतच अडकून राहतो.अनेक संकटांच्या खाचखळग्यांमधून मी उभा ठाकलो. थांबायचे नाही, ही एकच माझी जिद्द होती. हीच शिकवण मी माझ्या देश-विदेशातील विद्यार्थ्यांना देतो असेदेखील सचिन बुरघाटे यांनी सांगितले. बुरघाटे यांचे अनुभव ऐकण्यासाठी सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते.(प्रतिनिधी)