शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 13:06 IST

बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील भागातून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला.

नागपूर : आज(दि. ३१) सकाळी साडे ९ च्या सुमारास नागपूरमध्ये धावत्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यामुळे, परिसरात एकच गोंधळ उडाला होता. वाहकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

माहितीनुसार ही बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली.  यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील बोनेटमधून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. बसला अचानक आग लागताच एकच गोंधळ उडाला. यावेळी चालक दिवाकर काकडे यांनी बस जागेवरच थांबवून वाहक गिरीधर यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. तसेच, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. 

आगीच नेमकं कारण कळू शकलं नाही, मात्र, उन्हामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

दरम्यान, हवामान खात्याने तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यात दिवसा उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे. तापमान ४२ अंशावर असतानाच उन्हाच्या तडाख्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. 

टॅग्स :fireआगnagpurनागपूरroad transportरस्ते वाहतूक