शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

धावत्या बोलेरोचे टायर फुटले,२५ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:01 IST

धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तिथे असलेल्या असुविधांमुळे जखमींना त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालयाला कुलूप लावले. परिणामी काही वेळ वातावरण तापले होते.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तिथे असलेल्या असुविधांमुळे जखमींना त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालयाला कुलूप लावले. परिणामी काही वेळ वातावरण तापले होते.वाशी येथील एमएच-४०/बीजी-३०१० क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने गोसेखुर्द पुनर्र्वसित मरुपार व सालेशहरी येथील मजूर नक्षीकडे धान रोवणीसाठी जात होते. दरम्यान जवराबोडी शिवारात टायर फुटल्याने वाहन उलटले. वेगात असलेले वाहन उलटल्याने त्यातील २५ मजूर जखमी झाले. त्यांना लगेच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून १५ जणांना नागपूरला हलविले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर आ. सुधीर पारवे, चरणजितसिंग अरोरा, कृष्णा घोडेस्वार, कैलास कोमरेल्लीवार, करीम शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी रुग्णालयात पोहोचले.रुग्णालयाला ठोकले कुलूपअपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु तेथे एक डॉक्टर आणि एकच परिचारिका होती. त्यामुळे जखमींवर उपचार करण्यासाठी तारांबळ उडाली. जखमींचा आकांत पाहून रुग्णालयातील सफाई कामगारही मदतीसाठी पुढे सरसावले. जखमींवर उपचार करूनही काहींना नागपूरला हलविले. मात्र ग्रामीण रुग्णालयात अशी स्थिती नेहमीच उद्भवते. याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होऊनही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याचा संताप व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकले. माजी सभापती कृष्णा घोडेस्वार, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख संदीप निंबार्ते, युवक काँग्रेसचे कीर्तिसिंग चौरे, पुरुषोत्तम फाये, रमेश भजभुजे आदी यावेळी उपस्थित होते. तणावाची स्थिती पाहता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान तहसीलदार डी. जी. जाधव यांनी रुग्णालय गाठून पारवे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत पारवे यांची चर्चा घडवून आणली. दोन दिवसांत आरोग्य विभागाची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाचे कुलूप काढण्यात आले.जखमींना आर्थिक मदतजखमी झालेले सर्व शेतमजूर हे प्रकल्पग्रस्त आहे. पुनर्वसनस्थळावर रोजगाराचे साधन नसल्याने त्यांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागते. अपघातातील जखमांपेक्षा आमच्यासाठी रोजी बुडाल्याची वेदना अधिक असून उपचारासाठीसुद्धा पदरात दमडी नसल्याची व्यथा जखमी शेतमजूर करिश्मा मानकर यांनी मांडली. मजुरांची स्थिती बघून लगेच सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी जखमींना आर्थिक मदत केली.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर