शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:52 IST

आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआकृतिबंध कार्यालयीन रचनेची मागणी : मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रातील तीन हजार कर्मचारी वर्ग तीनमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा आकृतिबंध, कार्यालयीन रचना व पदोन्नतीसंबंधी योग्य असा निर्णय घेण्यास परिवहन विभागाला अपयश आले आहे. त्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेकडून अनेकदा मागण्या, निवेदन, प्रतिनिवेदन व पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु कोणताही निर्णय झाला नाही. १० डिसेंबर २०१६ मध्ये आकृतिबंध, कार्यालयीन रचना व पदोन्नतीचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु त्याचा अद्यापही फायदा झाला नाही. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मागण्या शासनापर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले होते. परंतु ११ सप्टेंबर २०१८ च्या परिवहन आयुक्तांच्या आदेशाने ‘ब’ वर्गातील पदेच कमी करण्याचा घाट घातला गेला. याच्या निषेधार्थ मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य कर्मचारी संघटनेचे सहसचिव गजानन राठोड यांच्या नेतृत्वात आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विवेक थूल, प्रशांत रामटेके, घनशाम घोडके, विजयाश्री नगरकर, राजश्री येनूरकर, आशिष उपासे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसagitationआंदोलन