शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘आरटीई’चा खेळखंडोबा !

By admin | Updated: April 28, 2015 02:30 IST

गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या

प्रवेशप्रक्रियेत क्रमांक लागूनदेखील प्रवेश नाही : विद्यार्थी-पालक वैतागले नागपूर : गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेत पालकांना समाधान कमी अन् मनस्ताप जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘आॅनलाईन’ सोडतीमध्ये क्रमांक लागूनदेखील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शहरातील मोठमोठ्या शाळांकडून चक्क नकार देण्यात येत आहे. काही शाळांनी तर त्या प्रकारचे फलकच लावून ठेवले आहेत. नामांकित शाळांच्या आडमुठेपणाच्या धोरणासमोर एरवी पालकांना नियमांचे धडे देणाऱ्या शिक्षण विभागानेदेखील मौन पत्करल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दोष नसतानादेखील आमच्या मुलांच्या हक्काचे शिक्षण हिरावण्याचा प्रयत्न सुरू असून याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शिक्षणमंत्री आहेत कुठे?शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘आरटीई’ प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात येईल, असा दावा केला होता. नागपूर दौऱ्यावर ते आले असताना ‘आरटीई’च्या संकेतस्थळाबाबत त्यांचे लक्ष वेधले असता कुठलेही ठोस उत्तर त्यांनी दिले नव्हते. आता शहरातील हजारो विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला असताना तावडेंनी कुठलाही ठोस निर्णय का घेतलेला नाही. मुळात शिक्षणमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी उपस्थित केला आहे. प्रवेशाच्या या गोंधळाबाबत सोमवारी मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आढावा घेतला. परंतु यातदेखील कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.शिक्षणाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याला शाळांच्या वाकुल्याखासगी शाळांकडून टाळाटाळ करण्याच्या मुद्याला गंभीरतेने घेतल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते. ज्या शाळा ‘आरटीई’अंतर्गत बालकांना प्रवेश नाकारतील, अशा शाळांवर शासकीय कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांनी दिला होता. परंतु पालकांच्या इतक्या तक्रारी आल्यानंतरदेखील शिक्षण विभागाने शाळांना जाब विचारण्याची हिंमत केलेली नाही.एक किलोमीटरच्या नियमांना हरताळशिक्षण हक्क कायद्यानुसार एक किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जावे, असा नियम आहे. हा नियम डावलून शहरातील नामांकित शाळांच्या प्रवेश यादीत तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांंची नावे आहेत. ‘आॅनलाईन’चा घोळ?हा सर्व घोळ ‘आॅनलाईन’ सोडतीमुळे निर्माण झाला असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. पुणे ‘एनआयसी’च्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये नर्सरी व पहिली असे दोन वेगळे गट करण्याची आवश्यकता होती. परंतु त्यात संभ्रम निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष वाया जाणार का?घराजवळ शाळा असल्याने व नियमांनुसार प्रवेशासाठी पात्र असल्यामुळे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळेलच, अशी पालकांना खात्री होती. पैशाअभावी बहुतांश जणांनी इतर ठिकाणी प्रवेश घेतले नाहीत. परंतु आता ‘आरटीई’मध्ये क्रमांक लागूनदेखील शाळा प्रवेश नाकारत आहेत. अशास्थितीत दुसऱ्या शाळेत शुल्क भरुन प्रवेश मिळेल की नाही, तसेच त्यासाठी पैसे कुठून आणायचे ही चिंता पालकांना लागली आहे. कुठलीही चूक नसताना मुलांचे एक वर्ष वाया जाते की काय, असा प्रश्नदेखील त्यांना सतावत आहे.