शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची प्रवेश प्रक्रिया ठप्प : पालकांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:17 IST

तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

ठळक मुद्देखासगी शाळांमध्ये प्रवेशाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. दुसरीकडे खासगी शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे.मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित असतात. त्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई लागू झाल्यापासून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षीपासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार घराच्या परिघापासून दीड किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. यंदा २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात ६८० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ६,७८५ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावेळी आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली तरी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर