शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

By योगेश पांडे | Updated: November 7, 2023 23:42 IST

शिक्षण, आरोग्याबाबत राबविणार सेवा प्रकल्प : विविध उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर

नागपूर : देशाच्या सीमाभागाजवळील गावांच्या बळकटीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींबाबध विविध सेवा प्रकल्प व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत जागृतीदेखील करण्यात येणार आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक गुजरातमधील भुज येथे पार पडली. त्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत यावर मंथन झाले.

मागील काही दशकांमध्ये सीमा भागातून अनेक नागरिकांनी देशाच्या इतर भागात स्थलांतर केले. स्थानिक लोकांना सीमा भागातील इत्थंभूत माहिती असते. तेथील परंपरा, संस्कृती यांच्यासोबतच तेथील सुरक्षेच्या मुद्यांवरदेखील त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मात्र, बहुतांश सीमा भाग हा डोंगराळ किंवा वाळवंटाने वेढलेला आहे. तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकांकडून स्थलांतर करण्यात येते. संघाकडून सीमा भागाच्या बळकटीकरणावर अनेकदा भाष्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारनेदेखील त्यादृष्टीने विविध पावले उचलली. याच शृंखलेत आता सीमा भागातील जनतेच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे.

संघ स्वयंसेवकांकडून सीमा जागरण मंच व सीमा जनकल्याण समितीच्या माध्यमातून या क्षेत्रांमध्ये काम करण्यात येते. तेथे जनतेचा विकास, आरोग्य, स्वावलंबन, शिक्षण इत्यादी बाबींवर विविध उपक्रम राबविण्यात येतील, तसेच सुरक्षायंत्रणांना सहकार्य व्हावे यासाठी जनतेमध्ये जागृती मोहीमदेखील सुरू करण्यात येईल. त्या भागांमधील धर्मपरिवर्तनावरदेखील लक्ष ठेवण्याबाबत संघाने नियोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरहद प्रणामसारखे उपक्रम राबविणारसीमा जनकल्याण समितीने काही काळाअगोदर सरहद प्रणाम नावाचा उपक्रम राबविला होता. सीमेवरील नागरिकांशी देशाच्या इतर भागांतील लोक जुळले पाहिजेत, हा त्यामागील उद्देश होता. त्या पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शाखापातळीवरील उपक्रमांत महिलांचा समावेश होणारसंघात महिलांना स्थान नाही, अशा आशयाची अनेकांकडून टीका होते. संघाच्या विविध उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्यावरदेखील अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. दर दोन महिन्यांनी शाखा पातळीवर स्वयंसेवक कुटुंब मिलनाचे आयोजन करण्यात येईल. त्या माध्यमातून तेथे महिला आल्यावर त्यांच्यासमवेत विविध सामाजिक मुद्यांवर चर्चा करत आवश्यक उपक्रम राबविण्यात येतील, तसेच संघ परिवारातील संघटनांच्या महिला सशक्तीकरणाच्या विविध प्रकल्पांमध्ये आणखी महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर असेल. देशपातळीवर पाचशेहून अधिक महिला सशक्तीकरण संमेलनेदेखील आयोजित करण्यात येतील.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ