शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, अझीम प्रेमजी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:23 IST

बुद्ध, मुस्लीम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ््याचे आयोजन मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.४० पासून होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश, महाराष्ट्रासह दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर या सोहळ््याला महत्त्व आले आहे. देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, पाकिस्तानच्या कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संघाचा विजयादशमी उत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव मानण्यात येतो.

बुद्ध, मुस्लीम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळाल्यानंतरचा हा पहिला विजयादशमी उत्सव आहे. सोबतच शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा, चीन व पाकविरोधातील केंद्र शासनाचे कडक धोरण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ््याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.

अझीम प्रेमजी यांची भेटप्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. भागवत यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली, शिवाय त्यांनी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर