शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?

By योगेश पांडे | Updated: December 14, 2023 23:05 IST

१९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील विजयानंतर भाजप आमदारांमध्ये उत्साह असून आता देशपातळीवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. १९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१४ मधील सत्ताबदलानंतर संघातर्फे अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार व मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यावर भर असतो. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपूरात आले आहेत. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनभाजपाच्या सर्व मंत्री व आमदारासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपचे सर्व मंत्री व आमदार उपस्थित राहतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. यंदा संघाकडून नेमके कोण पदाधिकारी मार्गदर्शन करणार याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. भाजपच्या एका वरिष्ठ आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर मंगळवारीच रेशीमबागेत भेट असल्याची माहिती दिली. दरम्यान, महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्यदेखील रेशीमबागेत जाणार का याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.

- जनतेमध्ये जाण्याच्या सूचना२०२४ च्या निवडणूकांना फार कालावधी राहिलेला नाही. अशा स्थितीत जनप्रतिनिधींनी जनतेमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने काम केले पाहिजे, असे संघाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. यासंदर्भातच संघाकडून आमदारांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोबतच भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनताहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMLAआमदारBJPभाजपा