शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एपी एक्स्प्रेसमध्ये ६० हजारांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:18 IST

एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.१७ नोव्हेंबरच्या रात्री २२४१५ एपी एक्स्प्रेसचे मुख्य तिकीट निरीक्षक महेश कुमार पटेल यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. या गाडीच्या बी १ कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे तीन पाकिटे बेवारस स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गाडी रात्री २.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. यावेळी सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, एस. बी. कामिलकर, संदीप डोंगरे, सहायक उपनिरीक्षक अनिल कुंवर यांनी बी १ कोचच्या शौचालयाची तपासणी केली. यावेळी त्यांना प्लायवूडच्या मागे तीन खाकी रंगाची पाकिटे आढळली. त्यानंतर श्वान रेक्सद्वारे या पाकिटाची तपासणी केली असता श्वानाने पाकिटात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. तिन्ही पाकिटे उघडून पाहिली असता त्यात ६० हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजा आढळला. कागदोपत्री कारवाईनंतर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांनी हा गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केला.रेल्वेस्थानकावर दारूच्या १०७ बॉटल जप्त : दोघांना अटकरेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील जवानांनी सलग ११ व्या दिवशी दोन तस्करांविरुद्ध कारवाई करीत दारूच्या ११०६० रुपये किमतीच्या १०७ बॉटल जप्त करण्यात आल्या.रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, जवान विकास शर्मा, विवेक कनोजिया सोमवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. तेवढ्यात १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव राहुल चंद्रभोगली कुत्तावर (२५) रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारशा आणि रोशन गौरीशंकर परिहार (२२) रा. मैसदेही, बैतुल असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ९५५० रुपये किमतीच्या ८१ बॉटल आढळल्या. दुसऱ्या कारवाईत प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर दुपारी ४ वाजता इटारसी एण्डकडील भागात विवेक कनोजिया यास एक बेवारस बॅग आढळली. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १४१० रुपये किमतीच्या २६ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू आणि आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस