शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 27, 2023 18:09 IST

पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळली

नागपूर : पत्नी व पाच वर्षाच्या मुलासाठी मंजूर आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही. त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी एवढी रक्कम मिळणे आवश्यक, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहेत. ते सधन कुटुंबात राहतात. त्यामुळे पत्नी व मुलाला पुढेही दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक पोटगी देणे पतीचे दायित्व आहे, असेही न्यायालय म्हणाले. पती अमरावती तर, पत्नी नागपूर येथील रहिवासी आहे. २७ डिसेंबर २०२१ रोजी कुटुंब न्यायालयाने संबंधित पोटगी मंजूर केली. पती सहकारी बँकेत व्यवस्थापक आहे. त्याला वेतनाशिवाय शेतजमिनीतूनही वार्षिक तीन लाख रुपयावर उत्पन्न होते, असा दावा पत्नीने पोटगी मागताना केला होता.

या दाम्पत्याचे २१ फेब्रुवारी २०१७ रोजी लग्न झाले. सासरची मंडळी पाच लाख रुपये हुंडा मागत होती. परंतु, पत्नीच्या वडिलाने केवळ अडीच लाख रुपये दिले. त्यामुळे पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. तिला मारहाण केली जात होती. तिला नातेवाईक व शेजाऱ्यांसोबत बोलू दिले जात नव्हते. तिला उपाशी ठेवले जात होते. दरम्यान, तिला २०१८ मध्ये घराबाहेर काढण्यात आले, असा आरोप आहे

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरhusband and wifeपती- जोडीदार