शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अजनी येथील वाईन शॉपमधून ६ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 21:49 IST

अजनीतील एका वाईन शॉपचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी ६ लाखांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही धाडसी चोरी उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देचॅनल गेट तोडून शिरले चोरटेदुकानदारांमध्ये घबराट

आॅनलाईन लोकमतनागपूर : अजनीतील एका वाईन शॉपचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी ६ लाखांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही धाडसी चोरी उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.फिर्यादी मयूर मदन जयस्वाल (वय ३४) यांचे अजनीच्या रामेश्वरी चौकात किसनलाल वाईन शॉप आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रविवारी रात्री १० च्या सुमारास ते बंद केले. शनिवार आणि रविवार असल्यामुळे दोन्ही दिवसांच्या व्यवहाराची ६ लाखांची रोकड त्यांनी घरी नेण्याऐवजी वाईन शॉपच्या काउंटरच्या ड्राव्हरमध्येच ठेवली. सोमवारी सकाळी ते वाईन शॉप उघडण्यासाठी आले असता त्यांना चॅनल गेटचे लॉक तुटलेले दिसले. चोरट्यांनी चॅनल गेट तोडल्यानंतर शटर उचकवून आत प्रवेश केला आणि ड्रॉव्हरमधील ६ लाखांची रोकड लंपास केल्याचे उघड झाले. या धाडसी चोरीची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली. अजनी पोलीस पोहचण्यापूर्वीच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासह पोहचलेल्या अजनी पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून चोरट्यांचा काही सुगावा मिळाला नाही. अजनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्यांना शोधण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत. सहा लाखांची रोकड लंपास करणा-या चोरट्यांनी शॉपमधील महागड्या दारूच्या बाटल्याही लंपास केल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

 

 

टॅग्स :theftचोरी