शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कामठी-कन्हान मार्गावर ४.६० लाखांचा गांजा पकडला : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:01 IST

पोलिसांनी कामठी-कन्हान मार्गावरील भुयारी पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये गांजाची वाहतूक करणारी कार पकडली. त्यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४.२५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देकारसह ८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : पोलिसांनी कामठी-कन्हान मार्गावरील भुयारी पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये गांजाची वाहतूक करणारी कार पकडली. त्यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४.२५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.मोहम्मद सादिक हबीबउर रहेमान (३८, रा. लकडगंज, कामठी), मुजाहिद कमाल अन्सारी मोहम्मद ताहीर (३४, रा. विणकर कॉलनी, कामठी) व फिरोज अख्तर मोहम्मद अल्ताफ (२०, रा. कोळसा टाल, कामठी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कामठी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमएच-३१/सीएन-४०७० क्रमांकाची कार कन्हानहून कामठी शहरात येत असल्याचे आढळून आले. संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी सदर कार भुयारी पुलाजवळ थांबवून कसून झडती घेतली. त्यात त्यांना तीन छोटी पोती (चुमडे) आढळून आली. तपासणीअंती त्या पोत्यांमध्ये गांजा असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेत अटक केली, शिवाय त्यांच्याकडून गांजासह कार जप्त केली.या कारवाईमध्ये ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४६ किलो गांजा, चार लाख रुपयांची कार, १२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि ३,३०० रुपये रोख असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा कामठी शहर व परिसरात विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो नेमका कुठून आणला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी कामठी पोलिसांनी एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५, कलम २० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. पी. नरोटे करीत आहेत.

टॅग्स :Anti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकPoliceपोलिस