शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

दहा महिन्यात बँकांमध्ये आल्या ३९.२४ लाखांच्या बनावट नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:09 IST

जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत नागपुरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोहचल्या.

ठळक मुद्दे३३१ प्रकरणे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत नागपुरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोहचल्या.रिझर्व्ह बँके तर्फे शुभा शांताराम काकडे (वय ५५, रा. सहकारनगर) यांनी सदर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदवली. त्यानुसार, वेगवेगळ्या बँकांमध्ये नमूद कालावधीत बनावट नोटांची ३३१ प्रकरणे उघडकीस आली. वेगवेगळ्या इसमांनी जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत १००, ५०० आणि १ हजारांच्या एकूण ५३४० बनावट नोटा जमा केल्या. त्यांचे एकूण मूल्य ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपये आहे. सदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ७४ हजार लंपासलकडगंज हद्दीत अशोक एकनाथ लांबट (वय ४५, ओमसाई नगर, कळमणा) यांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून ७४ हजार रुपये काढून घेतले. त्यांना १८ जुलैला रक्कम काढून घेतल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.गिफ्टचे आमिष दाखवून ३० हजार हडपलेलकडगंजमधील गरोबा मैदान, कापसे चौकाजवळ राहणारे रमेश वसंतराव सौदेकर (वय ४८) यांना २८ फेब्रुवारीला ९५६०५ १६८७१ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने फोन करून गिफ्ट लागल्याचे आमिष दाखवले. ते मिळवण्यासाठी सौदेकर यांच्या मोबाईलवरचा ओटीपी क्रमांक मिळवला आणि त्याआधारे त्यांच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर सौदेकर यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.दुस-याच्या भूखंडाची विक्री करून महिलेचे ७५ हजार हडपलेदुस-याच्या मालकीचा भूखंड आपला आहे, अशी थाप मारून आरोपी सतीश चंद्रकुमार चवटिया (रा. गोळीबार चौक, बाजीराव गल्ली) याने आशा संजय राऊत नामक महिलेला ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. आशा राऊत या यशोधरानगरात राहतात. वांजरा परिसरात एक हजार चौरस फुटाचा भूखंड दाखवून आरोपी सतीशने आशा राऊत यांना तो ७५ हजारांत विकत देण्याचा करार केला होता. रक्कम घेतल्यानंतर आरोपीने विक्रीपत्र करून दिले नाही. दरम्यान, तो भूखंड दुस-याच एका व्यक्तीचा असल्याची माहिती आशा राऊत यांना कळाली. त्यांनी आरोपीला आपली रक्कम परत मागितली असता तो टाळाटाळ करू लागला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने राऊत यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सतीशविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी