शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एलईडीमुळे महिन्याला २.०७ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:30 IST

शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची मदत मिळाली. यामुळे आतापर्यंत शहरातील १.४३ लाख पैकी १.१२ लाख पथदिवे एलईडीमध्ये परावर्तित करण्यात यश आले आहे. उर्वरित ३१ हजार एलईडी जूनअखेरपर्यंत बसविले जाणार आहेत.

ठळक मुद्देपथदिव्यांच्या जागी लावले १.१२ लाख एलईडी : वीजवापर ६१ हजार युनिटवरून ३२ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची मदत मिळाली. यामुळे आतापर्यंत शहरातील १.४३ लाख पैकी १.१२ लाख पथदिवे एलईडीमध्ये परावर्तित करण्यात यश आले आहे. उर्वरित ३१ हजार एलईडी जूनअखेरपर्यंत बसविले जाणार आहेत.पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने पथदिव्यावरील वीज खर्चात दर महिन्याला २.०७ कोटींची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आधी पथदिव्यांचा वीज खर्च दर महिन्याला ४.३५ कोटी होता. आता तो २.२८ कोटींवर आला आहे. संपूर्ण शहरात एलईडी बसविण्यात आल्यानंतर महापालिकेची वर्षाला ३८ कोटींची बचत होणार आहे.पथदिव्यांच्या वीज बिलावर महापालिका वर्षाला ५८ कोटी खर्च करते, म्हणजेच दर महिन्याला ४.३५ कोटी खर्च होतात, तर दर महिन्याला ६१ हजार युनिट वीजवापर होतो. स्थायी समितीत एलईडी लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर मे २०१९ पर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या धोरणामुळे अजूनही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत. काही आठवड्यात काम पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.वीज बिलावर वर्षाला १५ कोटींची बचत होईल. तसेच देखभाल व दुरुस्तीवरील खर्च विचारात घेता एकूण ३८ कोटींची बचत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पथदिव्यांवर ६१ हजार युनिट वीज खर्च होत होती. आता ३२ हजार युनिट वीज लागत आहे.एलईडीचा प्रकाश आपोआप मंदावतोया प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, पथदिव्यांच्या जागी लावण्यात आलेले एलईडी रात्री १० नंतर आपोआप मंदावतात. रात्री उशिरा १२ नंतर वीजवापर ४० टक्के कमी होतो. त्यानंतर पहाटे ६ पर्यंत ५० टक्के वीज बचत होते. अंतर्गत मार्गावर महापालिकेने ३६ वॅटचे एलईडी दिवे लावले आहेत, तर प्रमुख मार्गावर ६० वॅट, १०५ वॅट व १२० वॅट क्षमतेचे एलईडी लावलेले आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectricityवीज