शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:09 IST

शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे मेहता यांचे म्हणणे आहे. त्यांनी महामंडळाकडून १०० कोटी रुपये भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, महामंडळाला संबंधित खोटी प्रकरणे दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व यापुढे त्यांना अशी प्रकरणे दाखल करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने महामंडळाला नोटीस बजावून यावर २६ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देउद्योजक मनीष मेहता : विनाकारण विविध प्रकरणांत गोवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे मेहता यांचे म्हणणे आहे. त्यांनी महामंडळाकडून १०० कोटी रुपये भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, महामंडळाला संबंधित खोटी प्रकरणे दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व यापुढे त्यांना अशी प्रकरणे दाखल करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने महामंडळाला नोटीस बजावून यावर २६ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.महामंडळाने २००१ मध्ये नागपूर फाऊंड्रीज कंपनीविरुद्ध धनादेश अनादराचे प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्या प्रकरणात मेहता यांना कंपनीचे संचालक म्हणून प्रतिवादी करण्यात आले होते. वास्तविक मेहता यांचा या कंपनीशी काहीच संबंध नाही. यासंदर्भात महामंडळाला पूर्ण माहिती होती. परंतु, त्यांना वाईट हेतूने या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच, त्यांच्यावर आधारहीन आरोप करण्यात आले. न्यायालयात तथ्ये तोडूनमोडून सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने मेहता यांना नोटीस बजावली. याशिवाय महामंडळाने नागपूर फाऊंड्रीज कंपनीविरुद्ध १५ लाख ४४ हजार ४४८.१५ रुपये वसुलीचा दावा दाखल केला. त्यातदेखील मेहता यांना प्रतिवादी करण्यात आले. २००५ मध्ये पृथ्वी इस्पात कंपनीविरुद्ध दाखल धनादेश अवमानना प्रकरणात,२००२ मध्ये पार्श्व इंजिनियरिंग कंपनीविरु द्ध दाखल वसुली दाव्यात व अन्य काही प्रकरणांतही मेहता यांना विनाकारण प्रतिवादी करण्यात आले, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. मेहता यांनी या दाव्यासोबत त्यांच्या समर्थनातील साक्षीदारांची यादी व आवश्यक कागदपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. मेहता यांच्यातर्फे अ‍ॅड. विनोद सिंग यांनी कामकाज पाहिले.महामंडळाचा हेतू वाईटमेहता हे प्रतिष्ठित उद्योजक व नागरिक आहेत. ते अनेक संघटनांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी महामंडळाकडे कधीच आर्थिक मदतीची मागणी केली नाही. तसेच, महामंडळानेही त्यांना कधीच कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही. असे असताना महामंडळाने विविध फौजदारी प्रकरणांमध्ये मेहता यांना वाईट हेतूने प्रतिवादी केले. तसेच, त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप केले, असा आरोप दाव्यात करण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर