लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवात पूजेच्या फुलांची मागणी पाचपट वाढते. २८ आॅगस्टला गौरीपूजन असल्यामुळे देशी गुलाब दुपटीने आणि झेंडूच्या फुलांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढले आहेत. शिवाय एरवी ५० रुपयांना मिळणारा हार १०० रुपयांवर गेला आहे. भाववाढीचा फायदा शेतकºयांना होत असल्याची माहिती महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयंत रणनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.फुलांना प्रचंड मागणीगणेशोत्सवात पूजेसाठी गुलाब, झेंडू, निशिगंधा, गिलरडिया आणि शेवंती फुलांना जास्त मागणी असते. गेल्यावर्षीच्या तुलनेत गुलाबाचे भाव दुपटीने आणि झेंडूचे भाव तिपटीने वाढले आहेत. शनिवारी बाजारात देशी गुलाब ८० ते १०० रुपये किलो, हैदराबादी गुलाब १५० ते २०० रुपये, झेंडू (लाल, पिवळा) १०० ते १२० रुपये, शेवंती २५० ते ३०० रुपये आणि गिलरडिया फुलाचे भाव ७० ते ८० रुपये किलो होते. दोन दिवसांत गौरीपूजनासाठी फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.७० ते ८० कि़मी.हून आवकनागपुरातून फुलांची मुख्य बाजारपेठ सीताबर्डी, नेताजी मार्केटमध्ये नागपूरलगतच्या ७० ते ८० कि़मी. अंतरावरून पूजेची आणि सजावटीच्या फुलांची आवक होते. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये भावासंदर्भात अस्थिरता असल्यास पुणे, सांगली, सातारा, संगमनेर, अहमदनगर, मुंबई, हैदराबाद, अमरावती, अकोला, छिंदवाडा या भागातूनही फूले विक्रीसाठी येतात तसेच पॉलीहाऊसमधून सजावटीची फुले उत्पादक आणतात. नागपूर बाजारपेठेत भाव चांगले मिळत असल्यामुळे दररोज लहान-मोठ्या सात ते आठ ट्रकची आवक आहे.सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात मागणीकटफ्लॉवर अर्थात सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात मागणी असते. उत्पादक पॉलीहाऊसमधून फुले आणतात. जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, लिलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड, ग्लेडिओलस आदी फुलांची उन्हाळ्यात जास्त मागणी असते.शेतकºयांचा कापूस पिकावर भरहवामानाची अनियमितता आणि यंदा पाऊस कमी आल्यामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. दरवर्षी कापसाला चांगली मागणी आणि भाव पाच हजारांवर मिळत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हीच स्थिती आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात विक्री होणाºया झेंडूचे भाव गेल्यावर्षी याच काळात ३० ते ३५ रुपये किलो होते. यावर्षी १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत.
गुलाब व झेंडू १०० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:26 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवात पूजेच्या फुलांची मागणी पाचपट वाढते. २८ आॅगस्टला गौरीपूजन असल्यामुळे देशी गुलाब दुपटीने आणि झेंडूच्या फुलांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढले आहेत. शिवाय एरवी ५० रुपयांना मिळणारा हार १०० रुपयांवर गेला आहे. भाववाढीचा फायदा शेतकºयांना होत असल्याची माहिती महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयंत ...
गुलाब व झेंडू १०० रुपये किलो
ठळक मुद्देपूजेचा हार १०० रुपये : गुलाब दुप्पट व झेंडूचे भाव तिप्पट