शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खोली एक आणि वर्ग १ ते ५ : चार वर्षांपासून उघड्यावर भरते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:04 IST

पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर शाळेचा डोलारा शिक्षण विभाग कसा सांभाळत असेल, सर्वसामान्यांपुढे पडलेले हे एक कोडेच आहे.

ठळक मुद्देचिमणाझरीच्या नागपूर जि.प. शाळेची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर शाळेचा डोलारा शिक्षण विभाग कसा सांभाळत असेल, सर्वसामान्यांपुढे पडलेले हे एक कोडेच आहे.शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याचा आटापिटा शिक्षण विभाग करीत आहे. पण शिकण्याकरिता विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत अर्थात वर्गखोलीचीही गरज असते. शहरापासून अगदी १५ किमी अंतरावर असणाऱ्या उमरेड तालुक्यातील चिमणाझरी गावातील जि.प.ची शाळा एकाच वर्गखोलीत भरत आहे.५००च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात जास्तीत जास्त लोकसंख्या आदिवासी लोकांची आहे. या शाळेत वर्ग १ ते ५ साठी २ शिक्षक कार्यरत आहे. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने बांधकाम विभागाच्या आदेशाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ती पाडण्यात आली होती. त्याचवेळी नवीन वर्गखोली मंजूर करून ती त्वरित बांधण्यात येईल असे अधिकऱ्यांकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात चार वर्षे उलटून गेली, नवीन इमारत बांधून पूर्ण होणे तर सोडाच इमारत अद्याप मंजूर सुद्धा झालेली नाही.सर्वशिक्षा अभियान अंतर्गत वर्गखोली बांधून देण्याची मागणी जि.प कडे करण्यात आली आहे. गावकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये वर्गखोली मंजूर व्हावी यासाठीही प्रयत्न केले गेले परंतु तेथेही गरिबांच्या या लेकरांची कणव कुणाला आली नाही.गेली चार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत हे विद्यार्थी कधी उघड्या मैदानात तर कधी झाडाखाली तर कधी भिंतीच्या आडोशाला बसून शिकत आहेत. प्रशासनात काहीही चालत नसलेले शिक्षक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत उद्याच्या भारताचे भविष्य झाडाच्या खाली तर भिंतीच्या आड उघड्यावर निरभ्र आकाशाखाली घडवत आहे.विद्यार्थी हित लक्षात घेता जि.प.प्राथमिक शाळा चिमणाझरी येथे लवकरात लवकर वर्गखोली बांधकाम करण्यात यावे अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास भोयर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वलिदास उघडे, प्रीती फटिंग, बाळाराम राऊत, सिद्धार्थ गणवीर, ग्राम पंचायत सदस्य यमुबाई ढोक व पालकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा