शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील रुफटॉप रेस्टॉरंट्सनी  नियम बसवले धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 10:51 IST

नागपूर शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत.

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रुफटॉप रेस्टॉरंट व बारचे पीक आले असून हा फायद्याचा धंदा नियम पायदळी तुडवून जोरात सुरू आहे. महापालिका ठोस कारवाई करीत नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची राहील हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत. मुंंबई, दिल्ली वा अन्य मोठ्या शहरांत आग लागण्याची किंवा अन्य दुर्घटना घडल्यास कारवाई केली जाते. परंतु, काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. त्यामुळे अवैध रुफटॉप रेस्टॉरेन्ट व बार वर्षानुवर्षापासून धोकादायकरीत्या सुरू आहेत. नियमानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने एनओसी दिल्याशिवाय रेस्टॉरेन्ट व बार संचालित करता येत नाही. परंतु, यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी कोणत्याही रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरेन्ट व बारला परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली. रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट बारवर शहरातील विविध भागात कार्यरत नऊ अग्निशमन केंद्रांद्वारे कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात सिव्हील लाईन्समधील ३, कॉटन मार्केटमधील ३, नरेंद्रनगरातील २ तर, सुगतनगरातील १ रुफटॉप रेस्टॉरंन्ट कारवाई करून बंद करण्यात आले. तसेच, सुगतनगरातील रुफटॉप रेस्टॉरंट संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला.यामुळे परवानगी दिली जात नाहीआग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास नागरिकांना छतावर जाऊन मदत मागता यावी याकरिता इमारतीच्या छतावर बांधकाम करण्याची किंवा हॉटेल, रेस्टॉरंट व बार चालविण्याची परवानगी दिली जात नाही. छतावर आग लागल्यास चेंगराचेंगरी होण्याची भीती असते. त्या परिस्थितीत प्राणहानी व अन्य नुकसान अधिक प्रमाणात होते.हिवाळ्यात अधिक धोकाहिवाळ्यात रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बारमध्ये ग्राहकांना शेकोटीची सुविधा दिली जाते. त्यासाठी अस्थायी शेडही उभारले जाते. वर्धा रोडवरील काही रेस्टॉरंटच्या छतावरच स्वयंपाकगृह चालविले जात आहे. तसेच, ग्राहकांनाही छतावरच भोजन दिले जाते. सीताबर्डी, सिव्हील लाईन्स व सदर या भागात अनेक अवैध रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बार आहेत. तेथे कधीही आग लागू शकते.

इंटरनेटवर लांबलचक यादीइंटरनेटवर नागपुरातील रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बार सर्च केल्यास लांबलचक यादी पुढे येते. त्यातील सुविधांचीही माहिती दिली जाते. त्यामुळे अग्निशम विभाग हातावर हात ठेवून का बसला आहे, त्यांना मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का आणि दुर्घटनेत प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहील असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

परवानगी दिली नाहीअग्निशमन विभागाने कोणत्याही रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बारला परवानगी दिली नाही. इमारत आराखड्याला नगर रचना विभाग मंजुरी देतो. परंतु, छतावर हॉटेल, रेस्टॉरंट व बार चालविण्याची परवानगी दिली जात नाही. अग्निशमन विभाग नियमांच्या अंमलबजावणीसाठी नियमित कारवाई व आवश्यक चौकशी करतो. धोका आढळून आल्यास संबंधितांना नोटीस जारी केली जाते.- बी. पी. चंदनखेडे, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी.

टॅग्स :fireआग