शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देशातील मोस्ट वॉन्टेड महाठग नागपूरचा रोहित वासवानी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:26 IST

देशातील अनेक प्रांताच्या पोलिसांना हवा (वॉन्टेड) असलेला कुख्यात महाठग रोहित वासवानी याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पाचपावली पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देजयपूर येथून आणले पाचपावली पोलिसांची कामगिरी

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील अनेक प्रांताच्या पोलिसांना हवा (वॉन्टेड) असलेला कुख्यात महाठग रोहित वासवानी याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पाचपावली पोलिसांनी यश मिळवले.पाचपावलीतील वैशालीनगरात राहणारा वासवानी याचे दहा नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. २०१४ मध्ये त्याने टीसीएल कंझूमर कंपनी काढली. या कंपनीत भागीदारी आणि लाखोंचा लाभ मिळवून देतो, असे सांगून अविनाश चव्हाण (रा. जयताळा, सुभाषनगर) यांच्याकडून काही रक्कम तसेच त्यांची काही कागदपत्रे घेतली. त्या आधारे बँकेत खाते उघडले. नंतर दुसऱ्यांना गंडवण्यासाठी या बँक खात्याचा गैरवापर केला. अनेकांची रक्कम हडपल्यानंतर वासवानी नामनिराळा राहिला. मात्र, ज्यांनी या खात्यात रक्कम जमा केली होती, त्यांच्याकडून चव्हाण यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मे २०१७ मध्ये पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वासवानीची शोधाशोध सुरू झाली. कपडे बदलवल्यासारखे वेगवेगळे नाव बदलविणाऱ्या वासवानीला राजस्थान पोलिसांनी अटक केली असून तो जयपूरच्या कारागृहात बंद असल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पाचपावलीचे पोलीस जयपूरला पोहचले आणि त्यांनी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे महाठग वासवानीला अटक केली. त्याला शुक्रवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. आज त्याला कोर्टात हजर करून त्याचा पीसीआर मिळवण्यात आला.

देशभरात १६ गुन्हे दाखलअनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महाठग वासवानीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात १६ गुन्हे दाखल आहेत.  राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनाही तो वॉन्टेड आहे.

टॅग्स :crimeगुन्हे