शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेट उडाले,गो दा म जळाले

By admin | Updated: November 26, 2015 03:09 IST

इतवारी तीननल चौकाजवळील मच्छीसाथ येथे तीन माळ्याच्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर असलेल्या फोम गोदामाला बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. ..

नागपूर : इतवारी तीननल चौकाजवळील मच्छीसाथ येथे तीन माळ्याच्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर असलेल्या फोम गोदामाला बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीत गोदाम पूर्णपणे जळाले, पण सुदैवाने जीवहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार फटाक्यामुळे (रॉकेट) आग लागली. प्रत्यक्षदर्शी बाबा रंभाड आणि लीलाधर भिसीकर यांनी लोकमतला सांगितले की, काही लोकांकडे तुळशीविवाहचा कार्यक्रम होता. त्यांनी उत्सव साजरा करताना फटाके फोडले आणि रॉकेट आकाशात उडविले. त्यावेळी गोदामाची खिडकी उघडी होती. एक रॉकेट त्या खिडकीतून आत शिरले. त्या गोदामात असलेल्या फोममुळे आगीने उग्र रूप धारण केले.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु परिसरात वायरिंगचे मोठे जाळे असल्यामुळे गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. आग लागल्यानंतर गाड्या पाऊण तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही अब्दुल मलिक यांच्या दुकानाला दोनदा आग लागली आहे. या आगीमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली. ज्या इमारतीला आग लागली त्याच्या तळमाळ्यावर श्वेता सेंटर, साईबाबा मेटल स्टोर ही दुकाने आहेत. पहिल्या माळ्यावर गांधीबाग सहकारी बँकेचे कार्यालय आहे. आगीच्या घटनेनंतर बँकेतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याची माहिती आहे. यावेळी आगीमुळे होणारा अनर्थ लक्षात घेता एसएनडीएलच्या वतीने सोख्ता भवन आणि होलसेल क्लॉथ मार्केट येथील फीडर बंद करण्यात आल्याचे एसएनडीएलच्या प्रवक्त्याने सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बहादुरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. ९०० घरांचा वीजपुरवठा खंडित आगीच्या या घटनेनंतर एसएनडीएलने निवासी भागातील ट्रान्सफॉर्मर बंद केले. त्यामुळे या भागातील ९०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. महापौरांना घेराव घटनेची माहिती मिळताच महापौर प्रवीण दटके घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नागरिकांनी त्यांना १५ ते २० मिनिटे घेराव घातला. रहिवासी परिसरात ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.मदतीसाठी धावून आले नागरिकआगीच्या घटनेची माहिती इतवारी परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. यादरम्यान अनेक लोक मदतीसाठी धावून आले. कुणी अग्शिमन दलाला फोन केला तर कुणी पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अमोल ठाकरे, सूरज गोजे, गुड्डू टक्कामोरे, हरभगवान नागपाल आदींसह परिसरातील अनेक लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली.