शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाकूच्या धाकावर वर्दळीच्या ठिकाणी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:55 IST

स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंजमधील वर्दळीच्या जलाराम मंदिरानजीक गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देस्टील व्यापाऱ्याची रोकड लुटली : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंजमधील वर्दळीच्या जलाराम मंदिरानजीक गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.जयंत नारायणराव मडावी (वय ३१, रा. पिंपळगाव आर्वी, जि. वर्धा) हा तरुण सीताबर्डीच्या महाजन मार्केटमध्ये असलेल्या स्वानंद ट्रेडिंग कंपनीत कामाला आहे. स्वानंद ट्रेडिंग ही फर्म वानखेडे यांची असून, ते स्टील व्यापारी असल्याचे पोलीस सांगतात. जयंत मडावीकडे विविध व्यापाऱ्यांकडे असलेली उधारीची रक्कम गोळा करण्याची जबाबदारी आहे.नेहमीप्रमाणे वानखेडे यांच्या कार्यालयातून एक लाख रुपये घेऊन जयंत गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास सीताबर्डीतून पल्सरने लकडगंजमध्ये आला. जलाराम मंदिराजवळच्या एका व्यापाऱ्याकडून त्याने १ लाख ४५ हजार ५७६ रुपये घेतले. आधीचे एक लाख आणि ही रक्कम स्कूल बॅगमध्ये ठेवून तो आपल्या पल्सर (एमएच ३१/डीएच ५९२४)ने निघाला. त्याला ही रक्कम बँकेत जमा करायची होती. दुपारी ३.३० ला तो जलाराम मंदिराजवळ गोकुळ भवनसमोर आला असता अचानक दोन दुचाकींवर आलेल्या पाच लुटारूंनी त्याला अडवले. चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी त्याला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लुटारूंनी जयंतच्या खांद्याला अडकवलेली रोख रकमेची बॅग हिसकावून नेली. अवघ्या पाच मिनिटात ही घटना घडली. जयंतने प्रारंभी मालकाला आणि नंतर लकडगंज पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली.व्यापाऱ्यांत खळबळभरदुपारी वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने पोलीस हादरले. व्यापारी वर्तुळातही प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. लुटारूंच्या शोधासाठी आजूबाजूला चौकशी केली. परिसरात नाकाबंदीही केली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यात चाकूच्या धाकावर लुटमार झाल्याचे दिसून येते. दरम्यान, जयंतच्या तक्रारीवरून लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक उपाध्याय यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हेगारांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा