शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपूर-मुंबई दुरांतोवर दरोडा , तीन प्रवाशांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:50 IST

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा घालून प्रवाशांचा लाखावर मुद्देमाल पळविल्याची घटना भुसावळ विभागातील जळगाव ते पाचोरादरम्यान पहाटेच्या सुमारास घडली. तिन्ही प्रवासी नागपुरातील असून एस-२ आणि एस-४ कोचमधून प्रवास करीत होते. या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न गंभीर : जळगाव-पाचोरा दरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा घालून प्रवाशांचा लाखावर मुद्देमाल पळविल्याची घटना भुसावळ विभागातील जळगाव ते पाचोरादरम्यान पहाटेच्या सुमारास घडली. तिन्ही प्रवासी नागपुरातील असून एस-२ आणि एस-४ कोचमधून प्रवास करीत होते. या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेमुळे दुरांतोतील प्रवासी किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.अजय नारायण वासनिक (६०) रा. नझुल ले-आऊट, बेझनबाग, सूमन गोपाल जैस्वाल (४६) रा. रेवतीनगर, बेसा आणि अनिता सीताराम चिचोरिया रा. वीर चक्र कॉलनी, काटोल रोड अशी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे. वासनिक मुलासह १२२९० नागपूर -मुंबई दुरांतोच्या एस-४ कोचमधील १७, २० क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत होते. अनिता चिचोरिया या एस-४ आणि जैस्वाल एस-२ कोचमध्ये होत्या. भुसावळ रेल्वेस्थानकाहून गाडी पुढे निघाल्यानंतर पहाटेच्या सुमारास जळगाव ते पाचोरा दरम्यान सायडिंगला गाडी थांबली. अज्ञात दरोडेखोरांनी एस-४ च्या खिडकीचे काच उघडून वासनिक यांच्या मुलाच्या डोक्याखाली ठेवलेली लॅपटॉप बॅग, आयपॅड, हार्ड डिक्स, हेड फोन असा एकून ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. मुलाने आरडा ओरड केली असता वासनिक जागे झाले. तातडीने दार उघडून दोघांनीही दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, आरोपींची संख्या अधिक असल्याने ते परतले. तत्पूर्वी दरोडेखोरांनी जैस्वाल यांची सोनसाखळी, पर्स, मोबाईल, घड्याळ, रोख ५०० असा एकून १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तर चिचोरिया यांचे २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.दरोडेखोरांनी केली दगडफेकएस ४ कोचमधील अजय वासनिक यांच्या मुलाने आरडाओरड केल्यानंतर ते आणि त्यांचा मुलगा दरोडेखोरांच्या मागे धावले. परंतु दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केल्यामुळे ते आपल्या कोचमध्ये परत आले. याबाबत त्यांनी गाडीतील टीटीईलाही माहिती दिली. तर गाडीत एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी सांगितले.घटनेबाबत अधिकारी अनभिज्ञदुरांतोतील नागपूरच्या तीन प्रवाशांना दरोडेखोरांनी लुटले. परंतु या घटनेची भनकही ‘डीआरएम’ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती. प्रसार माध्यमांनी चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तर दुरांतो एक्स्प्रेसमधील टीटीई स्टाफनेही घडलेल्या घटनेची सूचना आपल्या वरिष्ठांना दिली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाrailwayरेल्वे