शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लुटमार करणारी सशस्त्र टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:17 IST

गणराज्य दिनाचे शहरात सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना एकाच रात्रीत पाच जणांना चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले १ लाख ५५ हजारांचे साहित्य आणि शस्त्र जप्त केले.

ठळक मुद्देपाचही गुन्ह्यांची कबुलीदीड लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणराज्य दिनाचे शहरात सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना एकाच रात्रीत पाच जणांना चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले १ लाख ५५ हजारांचे साहित्य आणि शस्त्र जप्त केले.अनुज संजय दहासहस्र (वय २१. रा. राजविलास टॉकीजवळ, महाल) हे २६ जानेवारीला रात्री कामावरून घरी परत जात होते. आरोपी रोहित अशोक पाटील (वय २३), रजत दिलीप ननेट (वय २१), कार्तिक राम ननेट (वय २२, सर्व रा. मेकोसाबाग, जरीपटका), कुणाल कुंदन डोंगरे (वय १९, रा. इंदोरा, साधू मोहल्ला, जरीपटका) यांनी अनूजला ताजबागला कोणत्या मार्गाने जायचे, अशी विचारणा करून थांबविले. चाकूच्या धाकावर त्याला मारहाण केली. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मांडीवर चाकू मारला. त्यानंतर त्याचा अ‍ॅपलचा मोबाईल व खिशातील १२० रुपये हिसकावून आरोपी पळून गेले. कोतवालीतील या गुन्ह्यासारखेच दोन गुन्हे त्यांनी जरीपटका ठाण्याच्या हद्दीत आणि सदर तसेच गिट्टीखदानमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच लुटमारीचे गुन्हे केले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा तपास करताना उपरोक्त आरोपीच्या टोळीला शनिवारी अटक केली. त्यांची ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून लुटलेले दोन मोबाईल, एक पल्सर मोटरसायकल, दोन अ‍ॅक्टीव्हा आणि चाकू तसेच ५०० रुपये असा एकूण १ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या निर्देशानुसार, गुन्हे शाखेचे (प्रगटीकरण) संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक कमलाकर गड्डीमे, प्रभाकर शिवूरकर, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोलीस उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हवलदार राजेश ठाकूर, शैलेष पाटील, रफिक खान, नायक अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, अतुल दवंडे, राजू पोतदार आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crimeगुन्हा