शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिकागोत दीडशे वर्षानंतर पुन्हा होणार ‘त्या’ भाषणाची गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 20:31 IST

संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुळून आलेला हा योग निश्चितच कलावंतांच्या मनाला उभारी देणारा असून, शहरात कार्यरत असलेल्या विविध नाट्यसंस्था व रंगकर्मींना चेतना देणारा आहे.

ठळक मुद्दे‘स्वामी विवेकानंद’ नाटक सातासमुद्रापार : प्रथमच नागपूरच्या नाट्यचमूचा अमेरिका दौरा निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुळून आलेला हा योग निश्चितच कलावंतांच्या मनाला उभारी देणारा असून, शहरात कार्यरत असलेल्या विविध नाट्यसंस्था व रंगकर्मींना चेतना देणारा आहे.महाराष्ट्र ही नाट्यनिर्मितीची भूमी आणि महाराष्ट्राचे नाट्यवेड अवघ्या भारतीयांना माहीत आहे. येथील नाटकांची भुरळ परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी नागरिकांमुळे, तेथील स्थानिक नागरिकांनाही लागली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई या व्यावसायिक नगरीत निर्मित होणारी कित्येक नाटके प्रत्येक महिन्यात परदेशवारी करून येत असतात. या परदेशवारीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते अमेरिकेचे. या देशात मोठ्या संख्येने मराठी माणसांसोबतच भारतीयांचे वास्तव्य आहे आणि मराठी नागरिकांमुळे, तेथील अमराठी भारतीय आणि स्थानिक नागरिकही नाटकांच्या प्रेमात आहेत. विशेष म्हणजे, नाटकांसाठी परदेशवारी करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या नाटकांसोबत आता, नागपूरचे नावही अंकित होणार आहे. ‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी नाटकाचा दौरा अमेरिकेत निश्चित झाला असून, अमेरिकेत नागपूरचे नाटक जाणारी ही पहिलीच घटना आहे. शुक्रवारीच नाटकासंबंधीच्या व्हीजा प्रक्रियेची पूर्णत: झाली असून, सप्टेंबरमध्ये हे नाटक थेट अमेरिकेकडे उड्डाण भरणार आहे. ‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी-मराठी नाटकात स्वामी विवेकानंदांचे जीवन अधोरेखित करण्यात आले असून, विश्व धर्मसभेत दीडशे वर्षापूर्वी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेल्या संपूर्ण भाषणाचा समावेश या नाटकात करण्यात आला आहे. त्या घटनेला ११ सप्टेंबर २०१९ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असून, याच तारखेला या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच सादर केला जाणार असल्याने, एक सुरेख योग जुळून आला आहे. त्यामुळे, दीडशे वर्षांपूर्वी धर्मसभेत गरजलेला स्वामी विवेकानंदांचा आवाज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गरजणार आहे.आधी दुबई, आता अमेरिका - संजय पेंडसेयापूर्वी २०१७ मध्ये दुबईमध्ये या नाटकाचे तीन प्रयोग केले होते. त्यापूर्वीपासूनच या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथे करण्याचा आमचा मानस होता. त्या प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सहयोगाने पूर्णत: मिळाली आहे. आतापर्यंत या नाटकाचे १४९ प्रयोग पूर्ण झाले आहेत. दरम्यान या नाटकाचे अनेक प्रयोग मिळाले. मात्र, स्वामींच्या त्या भाषणाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने, आम्ही या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच करण्याचा निर्धार केला असल्याने, अमेरिका दौऱ्यानंतर स्थगित केलेले सगळे प्रयोग करणार असल्याचे नाट्य निर्माते संजय पेंडसे यांनी सांगितले. अमेरिकेत सध्या सात प्रयोग निश्चित असून, प्रयोगाची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.स्वामींना महिलांची मानवंदनाया नाटकाचे लेखन शुभांगी भडभडे यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा सारिका पेंडसे यांनी सांभाळली आहे. नागपुरातून थेट अमेरिकेत नाटक सादर करण्याचा मान या दोन्ही महिलांना मिळाला असून, नागपूरच्या इतिहासात त्यांची नोंद होणार आहे. दुबईच्या निमित्ताने, त्यांनी हा मान आधीच मिळवला हे विशेष.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदNatakनाटक