शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘जिंदगी’च्या ट्रॅकवर निनादला ‘प्यार का गीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:33 IST

उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमाचे.

ठळक मुद्देलाईव्ह इन कॉन्सर्ट : नागपूरकर श्रोत्यांशी उषा खन्नांचा हृदय संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उषा खन्ना, एक असे नाव ज्यांनी चित्रपट संगीतकारांचा एकछत्री अमल असलेल्या राज्यात आपल्या प्रतिभेने स्वत:ची केवळ वेगळी ओळखच बनवली नाही तर थेट हृदयातून प्रसवलेल्या चालीद्वारे शेकडो गाण्यांना अजरामर करून टाकले. अशा सुरेल प्रतिभेच्या धनी असलेल्या उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमाचे. बुधवारी सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. जागतिक महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनाली हिवरकर, माया अग्ने, मनोरमा फुके, डॉ. सुभाष मेश्राम, डॉ. हेमंत सोनारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. ‘अल्लाह करम करना...’ या गीताने पुण्याहून आलेल्या मनिषा लताड यांनी या मैफिलीचा आगाज केला. ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हे टायटल साँगही त्यांनी सुरेल गायले. ज्योतीरामन अय्यर यांनी ‘दिल देके देखो...’ हे गाणे अतिशय जोशात सादर केले. अरविंद पाटील यांच्या ‘छोडो कल की बाते...’ या गीताने श्रोत्यांना फ्लॅश बॅकमध्ये नेले. ‘तेरे गलियो मे ना रखेंगे कदम...’ या संजय पोटदुखे यांच्या गीताने मस्त ‘समा’ बांधला. सागर मधुमटके आणि आकांक्षा नगरकर यांनी ‘प्यार करते हैं हम...’ हे युगुल गीत सुंदर गायले. सागरच्या संगतीने मनिषा लताड यांनी सादर केलेले ‘चाँद के पास जो किनारा हैं...’ या गाण्याला श्रोत्यांचा वन्समोअर मिळाला. पार्वती नायर यांनी उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेले मल्याळम गीत सादर केले. उद्घाटनीय सत्राचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. हार्मोनी इव्हेंटस्चे संचालक राजेश समर्थ यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात की-बोर्डवर राजा राठोड, परिमल जोशी, गिटार- प्रकाश चव्हाण, बेस गिटार- रिंकू निखारे, आॅक्टोपॅड-नंदू गोहणे, ढोलक- पंकज यादव, तबला- अशोक तोकलवार, तुंबा कांगो-राजेश धामणकर तर तालवाद्यावर उज्ज्वला गोकर्ण यांनी सुरेल सहसंगत केली.संगीत छंद नव्हे तपश्चर्याकाही लोक म्हणतात मला गायनाचा छंद आहे. पण, छंद चांगले खाण्याचा असू शकतो गायनाचा नाही. संगीतासाठी तपश्चर्या हवी असते, अशा शब्दात उषा खन्ना यांनी श्रोत्यांशी संवादाचा प्रारंभ केला. माझे काका नागपूरचे असल्याने या शहराशी एक वेगळेच भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. त्या या क्षेत्रात कशा आल्या, एक स्त्री म्हणून त्यांना किती संघर्ष करावा लागला, यश-अपयशाची स्थित्यंतरे त्यांनी कशी पचवली, असे पूर्वायुष्यातील अनेक अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितले. श्वेता शेलगांवकर यांनी त्यांना बोलते केले. यावेळी मंचावर शास्त्रीय गायिका कल्याणी मित्रा उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक