शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान : रविवारपासून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:40 IST

महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे.

ठळक मुद्देनागनदी, पिवळी व पोरा नदीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे.आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण अभियानाचे समन्वयन आणि संनियंत्रणाची जबाबदारी मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे नाग नदी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्याकडे पिवळी नदी तर उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडे पोरा नदी स्वच्छता अभियानाची जबाबदारी राहणार आहे. या व्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत.शहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झिक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असन त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख असतील. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, झोन स्तरावरील आरोग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे.पोरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी सकाळी ७ वाजता सहकार नगर घाटाजवळ, नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सकाळी ८ वाजता संगम चाळ येथे तर सकाळी ९ वाजता नारा घाट येथे पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होईल. या अभियानात यंत्रणेसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजित बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :riverनदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका