शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या फसवणुकीतील रितेश गोयल तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:31 IST

कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देप्रकरणातील आरोपींवर आर्थिक शाखेची नजर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे. आर्थिक शाखा या प्रकरणातील हव्या असलेल्या आरोपींवर काय कारवाई करते याकडे तक्रारकर्त्याचे लक्ष लागले आहे.ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३.९० कोटीची फसवणूक करणाऱ्या आरोपी रितेश गोयलला अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी त्याचा भाऊ देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगातून वॉरंटवर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. ३ ऑक्टोबरला जमानत झाल्यामुळे देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यानंतर रितेशला अटक करण्यात आली. आज रितेशला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यास तुरुंगात पाठविले. या प्रकरणात पोलिसांना निकिता गोयल, गोविंद गोयल आणि आणि अनिता गोयल हे हवे आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनुसार पोलिसांच्या संशयास्पद कामगिरीमुळे प्रकरणातील सत्यता बाहेर येत नाही. नागपूर, जबलपूर आणि रायपूरचे अनेक सट्टेबाज आरोपींशी जुळलेले आहेत. सट्टेबाजांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली आहे. त्यांनाही तक्रारकर्ता कोळसा व्यापारी संदीप अग्रवाल यांच्याप्रमाणे ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ते सुद्धा बराच कालावधीपासून वसुलीसाठी मागे लागले होते. अग्रवाल यांनी तक्रार केल्यामुळे काळ्या धनाचा भंडाफोड होण्याच्या भीतीने ते भूमिगत झाले आहेत. बारकाईने तपास केल्यास प्रकरणातील सत्यता बाहेर येऊ शकते. आरोपींना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची पूर्वीच माहिती होती. जबलपूर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे देवेंद्रला पोलिसांशी व्यवहार कसा करायचा हे माहीत होते. त्यामुळे आर्थिक शाखा आठवडा होऊनही आरोपींकडून ठोस माहिती मिळवू शकली नाही.युवतीची भूमिका महत्त्वाचीसूत्रांनुसार या प्रकरणात आरोपींकडे काम करणाऱ्या एका युवतीची महत्त्वाची भूमिका आहे. ती बऱ्याच काळापासून आरोपींकडे काम करत असून गोयल बंधूंचा तिच्यावर विश्वास आहे. तिला गोयल बंधूंच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती आहे. प्रकरणाची पोलीस तक्रार झाल्यामुळे ती सतर्क झाली होती. गोयल बंधूंच्या अटकेनंतर स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न करीत आहे. तिची चौकशी केल्यास धक्कादायक बाबींचा खुलासा होऊ शकतो.

टॅग्स :fraudधोकेबाजीjailतुरुंगnagpurनागपूर