शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

‘गाडी वाला आया घर से’ ने रुजविले स्वच्छतेचे संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:02 AM

‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात.

ठळक मुद्देबैरागींच्या गाण्याची देशभरातील राज्यात धम्माल

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाढ झोपेत असलेल्यांना उठविणे हा अघोषित गुन्हाच! त्यात नागपूरकर तुर्रमखानच म्हणावे. नागपूरकरांच्या ठसकेबाज स्वभावाची ख्याती सर्वदूर आहे. अशी धास्ती असतानाही, नागपूरकरांना उठविण्याची किमया एकाने साधली आहे. या किमयागाराच्या प्रेमात संपूर्ण नागपूरकर आहेत. कारण आहे स्वच्छतेचा संदेश देणारे ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे.सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. भीतीने नव्हे तर कौतुकाने. महापालिकेचे स्वच्छतादूत गाडी घेऊन फिरतात आणि सोबतीला रेकॉर्डवर हे गाणे असते. या गाण्याची मोहिनीच बघा, स्वच्छतेचा संदेश देणारे हे गाणे आता लग्न समारंभात डीजेच्या तालावर वाजायला लागले आहे आणि त्यावर धम्माल डिस्कोही व्हायला लागले आहे. नागपूरकरांच्या पसंतीस उतरलेल्या या गीताचे रचनाकार व गायक मध्य प्रदेशातील मंडला येथील रहिवासी श्याम बैरागी आहेत. या गीताची मोहिनी आज सबंध देशाला पडली असून, जगभरातील २२ देशातून ऐकले-वाजवले जात आहे. पेशाने ते प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत आणि मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच स्वच्छतेचे संस्कारही देतात. ज्याप्रमाणे मुरलीधराने फुंकलेल्या स्वराने संपूर्ण दुनिया मोहित झाली अगदी तशीच मोहिनी या किमयागाराने नागपूरकरांवर टाकली आहे आणि त्याचे नावही श्यामच आहे. सोबतच हृदयाने कवी असल्याने, वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गीत लेखनही करीत असतात. २०१६ मध्ये १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण देताना स्वच्छतेचे आवाहन केले आणि मी या मुद्याने प्रभावित झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मंडला नगर परिषदेकडून मला स्वच्छतेवर एक गीत लिहिण्यास सांगण्यात आले आणि स्वच्छतेचा जागर करणाऱ्या ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ या ओळी मेंदूत तरळायला लागल्या. त्यानंतर हे गाणे ‘स्याही दिल की डायरी’ या माझ्या युट्यूब चॅनलवर उपलोड केले आणि बघता बघता हे गाणे इतके हिट झाले की भारतासह २२ देशातून हे गाणे ऐकले-वाजवले जात असल्याचे बैरागी म्हणाले. मंडला नगर परिषदेनंतर खंडवा जिल्ह्यातील इतर चार नगर परिषदांनीही स्वच्छता अभियानासाठी हेच गाणे निश्चित केले. मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या गाण्याची निवड त्यांच्या त्यांच्या राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना मनोरंजनात्मक शैलीत स्वच्छता अभियानाशी जोडण्यासाठी केली. आज हे गाणे देशातील सर्व नागरिकांच्या ओठांवर आहे, यापेक्षा दुसरा आनंद नसल्याचे ते सांगतात.प्लास्टिक, कचरा, पर्यावरणश्याम बैरागी यांनी ‘गाडी वाला’ या गाण्यासोबतच ‘प्लास्टिक टाटा टाटा, प्लास्टिक बाय’ आणि इतर पर्यावरण संवर्धनावर रचना लिहिल्या आहेत आणि स्वत:च ते गायलेही आहेत. या गाण्यांची धूम छत्तीसगडमध्ये आहे. विशेष म्हणजे ‘गाडीवाला’ या गाण्याचे अनेक व्हर्जन्स निघत आहेत. घाणीच्या साम्राज्यातून देशाला मुक्त करणाºया या अभियानात माझे हे छोटेसे योगदान मला आनंद प्रदान करणारे असल्याचे श्याम बैरागी सांगतात.सरकारच्या योजनांची गीतमाला करणार - श्याम बैरागीकेंद्र असो वा राज्य, मला सरकारकडून अपेक्षा आहे. सरकारच्या ज्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या योजनांना गीत रूपात लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे, हे ‘गाडी वाला’ या गाण्याने सिद्ध केले. सध्या पर्यावरण आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गीत लेखन करून ठेवले आहे आणि माझ्या आर्थिक स्थितीनुसार त्यांचे रेकॉर्डिंगही करीत आहे. सरकारने मदत केली तर या कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल, अशी भावना श्याम बैरागी यांनी व्यक्त केली.नागपूर करेल का सन्मान?श्याम बैरागी यांच्या गीताचा उपयोग देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारे करत आहेत. मात्र, त्या मोबदल्यात त्यांना अद्याप काहीही प्राप्त झालेले नाही. मंडलासारख्या आदिवासी क्षेत्रात असल्यामुळे, त्यांची पोहोचही नाही. मधल्या काळात मंडलाच्या नगर परिषदेने त्यांचा सत्कार केला व मानधन देण्याचे मान्यही केले. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. नागपुरात स्वच्छता अभियानाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणाºया या गीतकाराला नागपूर महानगरपालिकेने सन्मानित करणे व मानधन देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका