शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक; श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोग

By सुमेध वाघमार | Updated: February 15, 2024 20:04 IST

कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे पुढे आले आहे.

नागपूर: कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे पुढे आले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोगानंतरचा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक बळावला आहे. नाकातून प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करीत असल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक असतो, अशी माहिती वरिष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.

-७७ टक्क्यांने कर्करोग वाढण्याची शक्यताजागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) वायु प्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांचा फुफ्फुसाचा कर्करोगाने मृत्यू होतो. दवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने याकर्क रोगाचा धोकाही वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगावर संशोधन करणाºया संघटनेने तंबाखू, लठ्ठपणा, मद्यपानासह वायू प्रदूषण हे देखील कर्करोगाच्यावाढीस प्रमुख घटक असल्याचे नमूद केले आहे. २०५०मध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या ३५ दशलक्षांपेक्षा जास्त होईल असेही, अभ्यासातून मांडले आहे. ही आकडेवारी २०२२ मधील आकडेवारीपेक्षा ७७ टक्के जास्त असून धोक्याची घंटा आहे. 

-यामुळे वाढतो फुफ्फुसाचा कर्करोगपोलिसायक्लिक अरोम्यॅटिक हायड्रोकार्बन, कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड आणि जड धातूंसारख्या कार्सिनोजेन्ससह विशिष्ट वायु प्रदूषकांच्या दीर्घकाळपर्यंत संपकार्मुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असेही डॉ. अरबट यांनी नमूद केले. हवेतील १० मायक्रोमिटरचे धूलिकण फुफ्फुसांमध्ये खोलवर प्रवेश करतात. अशा धूलिकणांशी दीर्घकाळ संपर्क व वाहन प्रदूषणातून उत्सर्जित होणारे संयुगे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. ओझोनमुळे पृथ्वीतलावर होणारे वायूप्रदूषण हा देखील फुफ्फुसाच्या वाढत्या कर्करोगामागील महत्वाचे कारण आहे. 

- हे घटकही जबाबदारीमहामार्गाजवळील शहरे, झपाट्याने विकसित होत असलेली महानगरे व त्यामुळे होणारे प्रदूषण आणि कारखान्यांसारख्या प्रदूषित वातावरणात काम करणाºया लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक संभवतो. वायू प्रदूषणासोबतच तंबाखूचे दीर्घकालीन धूम्रपान, इंधन आणि कोळसा ज्वलनातून उत्सर्जित होणारा वायू आणि अनुवांशिकता हे घटक देखील फुफ्फुसाचा कर्करोगाला कारणीभूत ठरतात. परंतु, हवेतील प्रदूषित सुक्ष्म कण फुफ्फुसातील ट्युमरच्या विकासास प्रोत्साहन देतात. त्यामुळे वायू प्रदूषण रोखणे आणि त्यापासून आपला बचाव करणे काळाची गरज असल्याचे डॉ. अरबट म्हणाले. -ही घ्या काळजी 

  •  महिना-दोन महिन्यापासून खोकला, श्वास घेण्यास त्रास वा दम लागत असल्यास त्वरित पल्मनरी फंक्शन टेस्ट करा.
  •  एक्स-रे, ब्रोन्कोस्कोपीसारख्या श्वसनारोग्यासंबंधित चाचण्या वेळीच करून घ्या.
  •  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या 
  •  पालापाचोळा किंवा प्लास्टिक आणि आवारातील कचरा जाळू नका. 
  •  सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा.
  •  वृक्ष लागवड करून प्राणवायूचे प्रमाण वाढवा. 
टॅग्स :nagpurनागपूरair pollutionवायू प्रदूषण