शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 08:53 IST

पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत.सध्या देशभरात कोरोनाने हाहाकार मचवला आहे. नागपुरात सुरुवातीपासून चांगल्या उपाययोजना करण्यात आल्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे. ती तशीच नियंत्रणात राहावी आणि लवकरात लवकर नागपूर कोरोनामुक्त व्हावे यासाठी अवघे प्रशासन रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. संचारबंदीदरम्यान रूट मार्च नाकेबंदी आणि गस्ती पथकाच्या माध्यमातून जनजागरण केले जात आहे. परंतु काहीजण याला दाद देत नसल्याचेही संतापजनक वास्तव आहे. पोलीस नसल्याचे बघून काहीजण घोळका करून चर्चा करतात तर फळ, भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंग न बाळगता एकमेकांना खेटून भाज्या-फळे खरेदी करतानाही दिसत आहेत.फळे, भाज्या आणि आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करणारी ही मंडळी अनेक ठिकाणी मास्कचाही वापर करताना दिसत नाही. त्यामुळे अवघे प्रशासनात चिंंताग्रस्त झालेले आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी आता ड्रोनच्या रूपातील तिसरा डोळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण चार ड्रोनचा वापर करून पोलीस उपराजधानीवर नजर ठेवणार आहेत. ज्या भागात गर्दी होताना दिसेल किंवा तसे संकेत मिळतील त्या भागात लगेच पोलिसांची पथके पोहोचतील आणि आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोका पिटाळून लावला जाईल.डीजीकडून मिळाले ड्रोननागपूर पोलिसांना डीजी आॅफिसकडून नुकताच एक अत्याधुनिक ड्रोन मिळालेला आहे तर पूर्वीचे तीन ड्रोनही नागपूर पोलिसांकडे उपलब्ध आहेत. त्यातील दोन ड्रोन सर्व्हिलन्स व्हॅनवर लावण्यात आलेले आहेत.या ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून कोणत्याच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतला दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस