शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वर्धा, भंडारा, चंद्रपूरमध्ये वाढतेय रुग्णसंख्या : विदर्भात तब्बल ६६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 21:58 IST

Rising number of corona patients in Wardha, Bhandara, Chandrapur वर्धा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात वेगाने रुग्ण वाढत आहेत. नागपूरमध्येदेखील बुधवारी रुग्णांची संख्या सहाशेहून अधिकनी वाढली. २४ तासात विदर्भात ६ हजार ९७० नवे बाधित आढळले व तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे ६,९७० नव्या रुग्णांची भर

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत असून सातत्याने आकडे वाढतच आहेत. पहिल्या लाटेदरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या नियंत्रित होती, तेथे संसर्ग वाढू लागला आहे. वर्धा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात वेगाने रुग्ण वाढत आहेत. नागपूरमध्येदेखील बुधवारी रुग्णांची संख्या सहाशेहून अधिकनी वाढली. २४ तासात विदर्भात ६ हजार ९७० नवे बाधित आढळले व तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू व बाधितांचे प्रमाण वाढत आहे. दिवसेंदिवस स्थितीत गंभीर होत असून दुसरी लाट जास्त धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात परत ४० बाधितांचे मृत्यू झाले. तर रुग्णसंख्या ३ हजार ७१७ इतकी होती. वर्धा जिल्ह्यात ५९ रुग्ण वाढले व ३०८ इतकी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली तर चार जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये २७६ रुग्ण नोंदविण्यात आले. २४ तासांत तेथील रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात २१९ रुग्ण आढळले व एकाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात काहीसा दिलासा मिळाला. बुधवारी तेथे ४४० रुग्ण नोंदविण्यात आले व ८ जणांचे बळी गेले. बुलडाण्यात परत साडेआठशेहून अधिक रुग्ण आढळले. तेथे ८५५ रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यात ३८१ रुग्ण नोंदविण्यात आले व दिवसभरात सहा जणांचे मृत्यू झाले.

जिल्हा : रुग्ण: मृत्यू

नागपूर : ३,७१७ : ४०

गोंदिया : ५० : ००

भंडारा : २१९ : ०१

चंद्रपूर :२७६ :००

वर्धा : ३०८ : ०४

गडचिरोली : ३९ : ०१

अमरावती : ३८१ : ०६

यवतमाळ : ४४० : ०८

वाशिम : २७८ : ०२

बुलडाणा : ८५५ : ००

अकोला : ४०७ : ०४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVidarbhaविदर्भ