शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:07 IST

प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले.

ठळक मुद्दे९ महिन्यात उपराजधानीत ९०० हून अधिक अपघात

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. काही विशिष्ट मार्गांवर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस विभागाला आढळून आले आहे. रिंगरोड हा शहरातील अपघातमार्ग ठरत असून सर्वाधिक अपघात येथेच झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील किती अपघात प्राणांतिक होते, शहरातून जाणाºया राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर किती अपघात झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. जनमाहिती अधिकाºयांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात एकूण ९०२ अपघात झाले. यातील सर्वाधिक ९० अपघात रिंगरोडवर झाले. त्याखालोखात अमरावती मार्गावर ६१ तर जबलपूर मार्ग व वर्धा मार्ग येथे प्रत्येकी ६० अपघातांची नोंद झाली. शहरात ९ महिन्यांमध्ये १६३ अपघात हे प्राणांतिक ठरले, तर ३४३ अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते. शहरातील अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. रिंग रोडवरील नवीन रस्त्यांच्या बांधकामाची गती संथ असल्यामुळे वाहतुकीला त्याचा फटका बसत आहे.आॅटोचालकांना ६० लाखांचा दंड४दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग करण्यात येते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व अपघाताची शक्यता वाढते. वाहतूक पोलिसांनी सप्टेंबरपर्यंत २६३२९ आॅटोंवर वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल कारवाई केली. आॅटोचालकांकडून ६० लाख ६३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा