शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ने सखी मंत्रमुग्ध

By admin | Updated: July 30, 2016 02:40 IST

बाहेर ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, आनंददायी हवामान आणि सभागृहात ओसंडून वाहणारा सखींचा उत्साह.

पावसाचे गीत व नृत्याच्या तालावर थिरकले सभागृह : कलर्स व लोकमत सखी मंचचे आयोजन नागपूर : बाहेर ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, आनंददायी हवामान आणि सभागृहात ओसंडून वाहणारा सखींचा उत्साह. प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष. युवती, महिला, पुरुष सारेच चिंबचिंब. नृत्याच्या तालावर तर अख्खे सभागृहच थिरकले. असा हा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेल्या गाण्याचा कार्यक्रम. निमित्त होते, कलर्स व लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित ‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रमाचे. शंकरनगर येथील साई सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला घेऊन नागपूरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. परिणामी, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण सभागृह फुल्ल झाले होते. यामुळे अनेक रसिकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद लुटला. ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या खास पावसावर आधारीत गीतांचा कार्यक्रम सुरू झाला. हिंदी-मराठी अशा एकाहून एक सरस गाणी सादर करण्यात आली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या भक्तिगीताने झाली. नागपूरची गुणी आणि सुरेख गायिका अंकिता टकले हिच्या गोड आवाजात ‘सूर निरागस हो’ या गीताने प्रचंड टाळ्या घेतल्या. नंतर प्रसिद्ध गायक आणि ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केलेले सुनील वाघमारे यांच्या ‘आज मौसम बडा बेईमान है बडा’ या गीताने वातावरण प्रसन्न झाले. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी गायलेले ‘रिमझिम गिरे सावन...’ या गीताला प्रसिद्ध गायक सागर मधुमटके यांनी त्याच अंदाजात सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. आकांक्षा नगरकर यांनी ‘ओ सजना बरखा बहार आई...’ गीत सादर करून ६० च्या दशकातील रसिकांच्या सोनेरी आठवणी ताज्या केल्या. आकांक्षा आणि श्रीकांत टकले यांनी सादर केलेल्या ‘चिंब भिजलेले’ या मराठी गीताला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. गीतांच्या या प्रवासात गायक कलावंतांनी एकाहून एक गीत सादर करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाची संकल्पना हार्माेनी इव्हेंन्टचे राजेश समर्थ यांची होती तर वादकांमध्ये नंदू गोहाने, राजा राठोड आणि पंकज यादव यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाला ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार व मंजूषा चकनलवार प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नेहा जोशी यांनी केले.(प्रतिनिधी)