शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

स्त्री भ्रूण हत्येकरिता ८२ जणांना सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:28 IST

स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.

ठळक मुद्देविधान परिषदेत माहिती : ७२ डॉक्टरांची सनद निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.संजय दत्त, शरद रणपिसे आदी सदस्यांनी नीती आयोगाचा हवाला देत मुलींचा जन्मदर २०१६ मध्ये १००० मुलांच्या मागे ९०४ इतका असल्याबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ५८५ कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. त्यापैकी अंतिम केलेल्या ३५० प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांमध्ये ११३ जणांना शिक्षा झाली. त्यापैकी ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा व १७ प्रकरणांमध्ये दंड ठोठावला आहे. यामध्ये गुंतलेल्या २०७ वैद्यकीय व्यावसायिकांची नावे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित करण्यात आली तर ५८ डॉक्टरांना ताकीद देण्यात आली.१७ महिन्यांत २६ हजार ६१९ बालमृत्यूराज्याच्या एचएमआयएस अहवालानुसार आॅक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या १७ महिन्यांच्या कालावधीत एकूण २६ हजार ६१९ बालमृत्यूंची नोंद झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील २३ हजार ८६५ व १ ते ५ वर्षे वयोगटातील २७५४ बालकांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात (धारणी व चिखलदरा तालुक्यात) सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील १०६ तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २७ बालके असे एकूण १३३ बालमृत्यू झाले. तसेच नंदूरबार जिल्ह्यात याच कालावधीत ४६ बालमृत्यू झाले. एचएमआयएसच्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये २४ तासाच्या आत एकूण ३७७८ अर्भकांचा मृत्यू झाला तसेच मुंबईमध्ये ४८३ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. किरण पावसकर, हेमंत टकले आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराबाबत गिरीशचंद्र व्यास, प्रा. अनिल सोले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावरील लेखी उत्तरात मुंडे यांनी पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता २०१८-१९ या आर्थिक वर्षात १६५४ कोटींचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला होता. त्यापैकी ११०१ कोटी १० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Vidhan Parishadविधान परिषद