शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना १६ हजार रुपयांची पोटगी योग्यच - उच्च न्यायालय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 6, 2023 12:53 IST

सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार

नागपूर : निवृत्त शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना एकूण १६ हजार रुपयांची मासिक पोटगी मंजूर करणे अयोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. शिक्षकाची पत्नी व अपत्यांच्या नात्याने ते आतापर्यंत दर्जेदार जीवन जगत आले आहेत. त्यामुळे पुढेही त्यांना समान जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले, तसेच या पोटगीविरुद्ध संबंधित शिक्षकाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अपत्यांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याच्या शहरात राहत आहेत. सुरुवातीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ४ डिसेंबर २०१५ रोजी पत्नीला ४ हजार व तीन अपत्यांना प्रत्येकी २ हजार, अशी एकूण १० हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली होती. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्नीला २ हजार ५००, मोठ्या मुलीला २ हजार, धाकट्या मुलीला १ हजार, तर मुलाला ५०० रुपये पोटगी वाढवून देण्यात आली. त्यामुळे एकूण मासिक पोटगी १६ हजार रुपये झाली. त्यावर शिक्षकाचा आक्षेप होता. सत्र न्यायालयानेही ही पोटगी कायम ठेवल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयानेदेखील पत्नी व अपत्यांचा तालुक्याच्या ठिकाणचा रहिवास, वाढलेली महागाई, शिक्षकाला निवृत्तीनंतर मिळालेले आर्थिक लाभ, त्याचे निवृत्तिवेतन, अपत्यांचे शिक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता शिक्षकाला दिलासा देण्यास नकार दिला. १६ हजार रुपयांची मासिक पोटगी अदा करणे, शिक्षकाच्या क्षमतेबाहेर नाही, असे न्यायालय म्हणाले.

पोटगी वाढवून मागता येते

एखाद्या व्यक्तीने पत्नी व अपत्यांची देखभाल करण्यास नकार दिल्यास पीडित पत्नी व अपत्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १२५ अंतर्गत सक्षम न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून संबंधित व्यक्तीकडून पोटगीची मागणी करू शकतात, तसेच भविष्यात संबंधित व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न वाढले, महागाई वाढली किंवा इतर परिस्थितीत बदल झाल्यास कलम १२७ अंतर्गत पोटगीमध्ये वाढही करून मागू शकतात.

- ॲड. समीर सोनवणे, हायकोर्ट

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर