शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी

By योगेश पांडे | Updated: February 20, 2023 17:58 IST

ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार

नागपूर : भरधाव ट्रेलरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या जवळच हा अपघात झाला. 

हिमांशू अशोक गजभिये (२५, पांढराबोडी, अंबाझरी) असे मृतकाचे नाव आहे. तो धीरज मनोहर दहीकरसोबत एका कंपनीत ‘कलेक्शन’चे काम करत होता. रविवारी दोघेही कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास ते परत येत असताना पारडी पोलीस ठाण्यासमोरील पंपजवळ हिमांशूच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या एमएच४०-बीजी-११६५ या ट्रेलरने धडक दिली. यात मोटारसायकलवरील ताबा जाऊन हिमांशू ट्रेलरच्या मागील चाकात येऊन गंभीर जखमी झाला. धीरजदेखील जखमी झाले.

आवाज ऐकून सर्वजण घटनास्थळाकडे धावले व जखमींना तातडीने मेयो इस्पितळात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हिमांशूला तपासून मृत घोषित केले. या अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार झाला. धीरजच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर