शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

नागपुरातून चीनला जाणार तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:26 AM

नागपूरचा बिगर बासमती तांदूळ पहिल्यांदाच चीनला मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टच्या नावा-शेवा टर्मिनलवरून २९ सप्टेंबरला जहाजाने रवाना होणार आहे.

ठळक मुद्देभारतातून पहिल्यांदा निर्यातप्रायोगिक तत्त्वावर पहिली आॅर्डर

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा बिगर बासमती तांदूळ पहिल्यांदाच चीनला मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टच्या नावा-शेवा टर्मिनलवरून २९ सप्टेंबरला जहाजाने रवाना होणार आहे. मौदाच्या नागपूर रोडवरील मारोडी येथील श्रीराम फूड इंडस्ट्रीज लिमिटेड हे तांदळाचे निर्यातक आहे. देशातून पहिल्यांदा चीनला तांदूळ निर्यात होत आहे. ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील क्विंदाओला येथे यावर्षी ९ जूनला भेट दिली होती. यावेळी उभय देशातल्या संबंधित खात्यांमध्ये यासंदर्भात करार झाला होता. त्यानुसार चीनच्या आॅईल व फूड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीराम फूड इंडस्ट्रीजच्या मारोडी येथील राईस मिलला भेट देऊन मिलची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी मिलची उपकरणे आणि प्रक्रियेवर समाधान व्यक्त करून तांदळाच्या निर्यातीवर शिक्कामोर्तब केले. तेव्हाच चीनला तांदूळ निर्यातीसाठी द्वार खुले झाले होते. त्यानंतर चीनकडून इंडस्ट्रीजला तांदूळ निर्यातीची परवानगी मिळाली. प्रायोगिक तत्त्वावर इंडस्ट्रीजतर्फे १०० टन बिगर बासमती तांदूळ चीनला पाठविण्यात येणार आहे.श्रीराम फूड इंडस्ट्रीजने १९ सप्टेंबरला १०० टन तांदूळ रेल्वेद्वारे चार कंटेनरने (प्रत्येकी २५ टन) मुंबईला पाठविण्यात आले. चारही कंटेनर २८ सप्टेंबरला सकाळी जहाजाने चीनला रवाना होतील. भविष्यातही चीनकडून आॅर्डर मिळण्याची शक्यता इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. अनुप गोयल हे इंडस्ट्रीचे संचालक असून ते देशातील सर्वात मोठे तांदूळ निर्यातक आहेत.या इंडस्ट्रीजतर्फे दरवर्षी वेस्ट आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये तांदळाची नियमित निर्यात करण्यात येते. इंडस्ट्रीजच्या आधुनिक प्रकल्पात महिन्याला धानापासून १५ हजार टन तांदूळ तयार करण्यात येतो.

टॅग्स :businessव्यवसाय