शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंतप्रधानांच्या सभेच्या तयारीचा आढावा

By admin | Updated: August 19, 2014 00:57 IST

मौदा एनटीपीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या तयारीचा आढावा सोमवारी कामठी-मौदा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली एनटीपीसी परिसराची पाहणीनागपूर : मौदा एनटीपीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या तयारीचा आढावा सोमवारी कामठी-मौदा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. मौदा येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल उपस्थित राहतील. पंतप्रधानांच्या जाहीर सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंग सुविधा, सुरक्षा व्यवस्था व सभेच्या व्यवस्थेचा आढावा यावेळी घेण्यात आला. हिंडाल्को कंपनीलगतचे मैदान, बाबदेव साखर कारखान्याचे मैदान येथे वाहन पार्किंग करण्यावर अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष सभा मंच तयार करण्यात येत असून, इतर प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.मौदा येथील कार्यक्रमासाठी येताना सुरक्षेच्या दृष्टीने बॅग, पिशवी, कॅमेरा, बॉटल आदी साहित्य आणू नये. पोलिसांनी यासंबंधी आवश्यक त्या सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले. यावेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे डीआयजी एच. आर. श्रीवास्तव, अ‍ॅडिशनल डीआयजी मान, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक डॉ. सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, मंगेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, उपविभागीय अधिकारी (महसूल) चंद्रकांत बोरकर, तहसीलदार शिवराज पडोळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायगोले, महाव्यवस्थापक व्ही. थंगापांडियन, अप्पर महाव्यवस्थापक (मानव संसाधन) व्ही. शिवप्रसाद, व्यवस्थापक प्रशांत सिंह उपस्थित होते. (प्रतिनिधी)