शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागाची महसूल वसुली १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:31 IST

विभागाने महसूल वसुलीत यंदाही शंभरी पार केली आहे. उद्दिष्टापेक्षा सात टक्के जास्त वसुली केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ११०.५ टक्के वसुली करीत विभागात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देउद्दिष्टापेक्षा सात टक्के अधिक वसुली : गडचिरोली जिल्ह्याची वसुली ११०.५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विभागाने महसूल वसुलीत यंदाही शंभरी पार केली आहे. उद्दिष्टापेक्षा सात टक्के जास्त वसुली केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ११०.५ टक्के वसुली करीत विभागात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.वर्ष २०१७-१८ आर्थिक वर्षात विभागात ६३२ कोटी २६ लाखांचा महसूल गोळा झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत १०७ टक्के वसुली झाली. दुष्काळ आणि जीएसटीमुळे वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत शेवटच्या टप्प्यात वसुली केली. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली. गेल्या वर्षीही शंभर टक्के वसुली झाली होती. यंदाही शंभर टक्केचा टप्पा पार पाडण्यात आला. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी वसुलीसाठी विशेष लक्ष दिले होते. सर्व जिल्हाधिकारी यांची नियमित आढावा बैठक घेतली. यात वसुलीकडे लक्ष देत विशेष नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांनीही विशेष मेहनत घेतली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेत विशेष मोहीम राबविली. त्यामुळे सर्वाधिक वसुली नागपूर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ११०.८५ टक्के म्हणजे २५८ कोटी ८६ लाख १५ हजार रुपयाची वसुली झाली. जमीन महसुलातून २२३ कोटी ७६ लाख, करमणूक करातून ८ कोटी ८८ लाख तर गौण खनिजातून ३९९ कोटी ६१ लाखांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीही नागपूर विभागाने शंभर टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट गाठत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता.

जिल्हा                                                      उद्दिष्ट                                                         वसुली  

  
 नागपूर                                             २३३ कोटी ५३ लाख                                      २५८ कोटी ८६ लाख   
 वर्धा                                                  ६८ कोटी ३० लाख                                         ७१ कोटी ७८ लाख   
 भंडारा                                                ८८ कोटी ६१ लाख                                          ९१ कोटी ४३ लाख   
गोंदिया                                              ४० कोटी २ लाख                                           ४२ कोटी २२ लाख   
 चंद्र्रपूर                                               १०७ कोटी ८८ लाख                                        ११० कोटी १७ लाख   

 गडचिरोली                                         ५२ कोटी ५० लाख                                          ५७ कोटी ७८ लाख

 
टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर