शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आमचे शिक्षक परत द्या : शिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 00:56 IST

कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत कामामध्ये नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा शासनाकडून सूचना असताना, नागपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शासनाच्या सूचनेनुसार ज्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना कार्यमुक्त करावे, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत कामामध्ये नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा शासनाकडून सूचना असताना, नागपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शासनाच्या सूचनेनुसार ज्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना कार्यमुक्त करावे, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून २४ जून रोजी एक परिपत्रक निर्गमित करून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जे शिक्षक कोरोनाच्या कामात नियुक्त आहेत,त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला विनंती करण्यात यावी, असे म्हटले होते. दरम्यान, १७ आॅगस्ट रोजी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत पुन्हा एकदा परिपत्रक निर्गमित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. परंतु त्याचीसुद्धा कोणतीही दखल जि.प. अथवा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. चालू शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सुरू आहे. तसेच शाळेबाहेरची शाळा हा उपक्रमसुद्धा शाळेत राबविल्या जात आहे. शिवाय शिक्षण सभापती यांच्या सूचनेनुसार किमान एका शिक्षकाने दररोज शाळेत उपस्थित राहण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांना दररोज शाळेत उपस्थित राहावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहायचे की कोरोनाच्या संबंधाने झालेल्या नियुक्तीच्या कामावर उपस्थित राहायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.शिक्षणाधिकारी प्रा. चिंतामण वंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात विनंती करीत म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळा बंद असल्याने ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच्या शाळेत बोलावून ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी करायचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामातून त्यांना कार्यमुक्त करावे.

टॅग्स :Teacherशिक्षकcollectorजिल्हाधिकारी