शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

निवृत्त पोलीस अधिकारी महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:15 IST

निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देघातला ७१ हजारांचा गंडा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकात मयूर पॅलेसमध्ये सुहासिनी मेश्राम राहतात. त्यांनी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमधून काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्सच्या माध्यमातून वॉशिंग मशीन विकत घेतली होती. ठरल्याप्रमाणे आठ हप्त्यात त्यांनी कर्ज फेडले. २० मार्चला दुपारी २ वाजता त्यांना एक फोन आला. वॉशिंग मशीन कर्ज प्रकरणात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या तीन ओटीपीचे क्रमांक सांगा, असे म्हणत आारोपीने त्यांच्याकडून माहिती काढून घेतली. त्याआधारे मेश्राम यांच्या बजाज फायनान्सच्या खात्यातून आॅनलाईन ७१,११९ रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. ही रक्कम वसूल करण्यासाठी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेश्राम यांच्यामागे तगादा लावल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाcyber crimeसायबर क्राइम